करमाळा प्रतिनिधी करमाळा येथून पवित्र अशा हज यात्रेसाठी जाणाऱ्या अमजद घोडके व त्यांचा परिवार व तसेच आतिक बेग व त्यांचा परिवार यांचा समाजिक कार्यकर्ते श्रेणीकजी खाटेर त्यांच्या मित्र परिवारच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी बोलतानी श्री श्रेणिक खाटेर यांनी हज यात्रेचे किती महत्व आहे हे आपल्या मनोगनातून व्यक्त केले यात्रेला जायच्या अगोदर कुणाचे मन दुखावले असेल वाईटपणा आला असेल अश्या सर्वाची माफी मागूनच यात्रेला जावे लागते तसेच तेथे गेल्यावर ही झाडाचे पान न तोडता कोणत्या ही जीवजंतू ला त्रास होऊ द्यायचा नाही असा त्यांचा नियम आहे असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी सुभाष काका बलदोटा, मुन्ना भाई काझी, गिरीश शाहा, जमील भाई काझी, सादिक भाई शेख, विजय बरीदे, वर्धमान खाटेर, प्रवीण गंधे, प्रीतम राठोड, अभय शिंगावी यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते ॲडवोकेट संकेत खाटेर यांनी आभार मानले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…