आदिनाथ सहकारी साखर यंदाच्या वर्षी कसल्याही परिस्थितीत चालु करण्यासाठी बागल गट पाटील गटाच्या नेत्याच्या जोरदार हालचाली सुरू

करमाळा प्रतिनिधी आदिनाथ सहकारी साखर कारखाना आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बागलगट पाटील गट शेतकऱ्यासाठी एकत्र येऊन यंदाच्यावर्षी आदिनाथ साखर कुठल्याही परिस्थिती चालू करणार असुन शेतकरी सभासद कामगार सर्व संचालक मंडळांनी आदिनाथ कारखान्याला गत वैभव प्राप्त करून कामाला लागले आहेत.शनिवारी बागल  गटाचेवतीने रश्मी बागल यांनी बैठक घेतली आहे.  माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी आढावा बैठक घेतली आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चालू करण्याच्या आढावा बैठकीत प्रसंगी बोलताना त्यांनी व्यक्त केले. यावेळी ऊस तोड वाहतुक वाहन करार या संदर्भातही चर्चा झाली. लवकरच आदिनाथ चालू करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करून आदिनाथाच्या कृपाआशीर्वादाने सत्याची लढाई जिंकुन आदिनाथ साखर कारखाना पुन्हा शेतकरी सभासदाच्या कामगारांच्या जोरावर गत वैभव मिळवणार असल्याचे दिसत आहे बागल गटाच्या नेत्या आदिनाथच्या संचालिका सौ. रश्मी बागल आदिनाथ कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे व्हाईस चेअरमन नानासाहेब लोकरे संचालक लक्ष्मण गोडगे दिलीप केकान अविनाश वळेकर नामदेव भोगे प्रकाश झिंजाडे पांडुरंग जाधव स्मिता राजेंद्र पवार बागल गटाचे सर्व संचालक उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

3 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

6 days ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

7 days ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

1 week ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

1 week ago