करमाळा प्रतिनिधी
जल जीवन मिशनअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेसाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा फंड दिला आहे. गावातील प्रत्येक नागरिकाला पिण्याचे पाणी मिळावे हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. ही कामे जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत वेगवेगळया ठेकेदारांनी ऑनलाईन पध्दतीने गावोगावातील टेंडर भरली गेली. त्यापैकी काही टेंडरची मुदत १२ सप्टेंबर रोजी संपली आहे.
सदर कामे दुस-या दिवशी म्हणजे १३ तारखेला पब्लिश होणे गरजेचे होते. परंतु पाणी पुरवठयाचे
अधिकारी हे ठेकेदारांना मॅनेज करण्यासाठी आणि स्वतःला जास्त टक्केवारी मिळविण्यासाठी आतापर्यंत हे टेंडर पब्लिश केली गेली नाहीत. शिवाय उरलेल्या गावातील कामाची मुदत १९ सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे २० सप्टेंबर रोजी ही कामे पब्लिक होणे आवश्यक आहे.२० सप्टेंबर रोजी कामे पब्लिश न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे अतुल खूपसे पाटील यांनी दिला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, याबाबत पाणी पुरवठयाचे कार्यकारी अभियंता दिपक कोळी यांना भेटलो. परंतु, यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. अक्कलकोट, बार्शी,
करमाळा, माढा, माळशिरस, दक्षिण सोलापूर, या तालुकयातील अनेक गावातील कामे
रककम १ कोटी ८९ लाख ३२ हजार एवढी असुन या कामात प्रत्येक ठरलेलेच कॉन्ट्रॅक्टरलाकामे मिळवून देण्यासाठी अधिकारी काम जाहिर करत नाहीत. म्हणून ‘बिलो’ ने भरलेल्याप्रमाणीक कॉन्ट्रॅक्टरला काम मिळत नाही. यामुळे शासनाच्या तिजोरीचा तोटा होतो.आणि ठेकेदाराची लॉबींग करुन अधिकारी कोटयावधी रुपयांची माया जमा करीत
आहेत. तसेच शासनाचा असणारा पैसा व सामान्य गरीबांच्या टॅक्स मधुन जमा केलाजातो. आणि जनतेचे नोकर असणारे अधिकारी ठरावीक ठेकेदारांना कोटयावधी रुपये मिळवुन देण्यासाठी २%, ५% घेऊन कामे पब्लिश करण्यास दिरंगाई करतात. म्हणून ही कामे त्वरीत दिनांक २० सप्टेंबर पर्यंत पब्लिश करावीत अन्यथा हजारो ग्रामस्थ आणि शेतक-यांना घेऊन सोलापूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर २१ सप्टेंबर रोजी जनशक्ती संघटना आंदोलन करणार असल्याचा इशारा अतुल खुपसेनी यावेळी दिला आहे.
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…