करमाळा प्रतिनीधी
बालपणापासूनच बचतीची सवय लागावी यासाठी हिवरे ता करमाळा येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी बचत बँक सुरू करण्यात आली आहे. या बँकेचे वैशिष्ट्य म्हणजे बॅंकेचे कामकाज विद्यार्थीच सांभाळत असून, आत्तापर्यंत 80 खातेदार आहेत.विद्यार्थ्यांना बचत करण्याची सवय लागावी या हेतूने हि बॅंक सुरु करण्यात आली आहे.या उपक्रमामध्ये शाळेतील १ ली ते ७ वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा विविध माध्यमातून प्रत्यक्ष सहभाग येत आहे. यामध्ये बँकेचे खातेदार, बँक मॅनेजर, कॅशियर, व्यवस्थापक, दररोजचा हिशोब या सर्व जबाबदा-या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी स्वतः सांभाळत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना बचती बरोबर प्रत्यक्ष बॅंक कामकाजाचा अनुभव मिळत आहे. विशेष म्हणजे दर आठवड्यात कॅशियर मॅनेजर यांची बदली करून संधी दिली जात आहे.
या बँकेच भागभांडवल २ हजार रुपयांपर्यंत गेले आहे. व्यवहारासाठी प्रत्येकाचे स्वतंत्र असे पुस्तक देखील केले असुन त्यावर दैनंदिन व्यवहार लिहिला जात आहे
या पैशातून विद्यार्थी वही, पेन इत्यादी साहित्य खरेदी करतात. त्यामुळे त्यांना बालपणापासून बचतीची सवय झाली आहे. त्याबरोबरच बँकिंगचे व्यवहार बालपणात समजू लागले आहेत. प्रयोगातून विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा, असा उपक्रमाचा उद्देश आहे. शाळा मुख्याध्यापक सुग्रीव निळ, निळकंठ हनपुडे, जालिंदर हराळे, सतिश सुर्यवंशी, नवनाथ खरात, सुरेश शिंदे,पल्लवी कुलकर्णी दुधाळ गुरुजी, अंकुश माने आदिंचे मार्गदर्शन लाभत आहे.
शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष शंभुराजे फरतडे उपाध्यक्ष सिद्धेश्वर शिंदे व ग्रामस्थांकडून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.
करमाळा प्रतिनिधी निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…
करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…
करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…