करमाळा प्रतिनिधी
करमाळा नगरपरीषदेच्या कार्यालयावर गाळफेक आंदोलन करुन गावातील सर्व कचरा नगरपरीषदेसमोर टाकण्यात येईल. असा इशारा नगरसेवक सचिन घोलप यांनी दिला आहे
करमाळा शहरात गेल्या १० ते १६ दिवसांपासून शहरातील कचरा गोळा करणाऱ्या कचरा गाड्यांची सेवा बंद असल्याने शहरात प्रचंड कचरा साठला असुन सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न बनला आहे. जागोजाग कचऱ्याचे ढीग साठले असुन गत १० दिवसांपासून गटारींचीही स्वच्छता करण्यात आलेली नाही. अधिक चौकशी केली असता सदर सार्वजनिक स्वच्छता करणाऱ्या कचरा गाड्यांच्या संबाधित कंत्राटी कामगार हे टाऊन हॉल येथे गणेश विसर्जनासाठी कृत्रिम हौद बनविण्यात आलेला आहे. त्यामध्ये सध्या अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन केलेल्या गणेशमुर्ती आहेत. त्या पाईंटवर सफाई कामगारांना रखवालदारी करण्यासाठी दिवसरात्र नेमणुक केली आहे. त्यामुळे शहर स्वच्छतेसाठी सफाई कर्मचारी कमी पडत आहे. शिवाय आठ प्रभागांना आठ स्वतंत्र गाडया देवुनसुध्दा सध्या केवळ ३ कचरागाडयाच कार्यरत आहे. इतर गाडया नादुरुस्त असुन गॅरेजला आहेत असे जाणुनबुजुण निखालस खोटे उत्तर प्रशासनाकडुन सांगण्यात येते. वास्तविक सफाई कामगारच कमी आहेत. वास्तविक शहरातील सर्व नागरीक आता सध्या नवरात्री निमित्त आपआपल्या घराची स्वच्छता करुन रंगरंगोटीची कामे करीत आहेत. त्यामुळे सर्वत्र कचरा वाढ होत आहे. सदरचा कचरा रोजच्या रोज गोळा व्हायला हवा आहे. तो न झाल्याने शहरात सर्वत्र दुर्गंधी व रोगराई पसरली आहे. अनेक रुग्ण हे डेंग्यू, मलेरीया व गोचीड तापाने आजारी आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तसेच शहरातील गटारींचीही स्वच्छता होत नसल्याने अत्यंत दुरवस्था झालेली आहे. नगरपरीषदेच्या प्रशासनाचे या सर्व बाबींकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. वास्तविक करमाळा शहरात आता आठ दिवसांवर ग्रामदेवत आई कमलाभवानी मातेच्या नवरात्र महोत्सवास सुरुवात होत आहे. त्यापुर्वी तातडीने शहर स्वच्छता मोहिम घेऊन शहरातील सर्व कचरा गाड्यांद्वारे प्रत्येक गल्ली वॉर्डामधील कचरा गोळा करून गटारी स्वच्छ कराव्यात. याबाबत तातडीने ८ दिवसांत सदरची कार्यवाही करावी अन्यथा करमाळा नगरपरीषदेच्या कार्यालयावर गाळफेक आंदोलन करुन गावातील सर्व कचरा नगरपरिषदेसमोर टाकण्यात येईल असा इशारा नगरसेवक सचिन घोलप यांनी दिला आहे.
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…