करमाळा प्रतिनिधी
प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांना संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख पद देण्यात आले असून आता त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व सत्ता केंद्रावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा भगवा फडकवावा असे आवाहन उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी केले.ओयावेळी जिल्हाप्रमुख महेश चिवटे चरण चौरे गायकवाड पंढरपूर तालुका अध्यक्ष बाबर आदी पदाधिकारी उपस्थित होते
आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक शिवाजीराव सावंत गेली पंचवीस वर्षापासून सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्य करत असून शिवसेना संपर्कप्रमुख म्हणून गेली दहा वर्षापासून काम पाहत होते
अनेक साखर कारखाने शैक्षणिक संस्था व उद्योग संस्थेच्या माध्यमातून जवळपास सावंत कुटुंबीयांसोबत चाळीस हजार कर्मचारी काम करत आहेत एवढी प्रचंड ताकद असलेल्या प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांना संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख पद नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे
यावेळी बोलताना शंभूराजे देसाई म्हणाले की आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंत्री असून त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्याचे उत्तम काम सुरू आहे
येणाऱ्या काळात सोलापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिका नगरपंचायत विधानसभा लोकसभा या निवडणुका लढवण्यासाठी प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी संपूर्ण जिल्ह्याचे संघटन मजबूत करावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सावंत कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे सांगितले.नंतर बोलताना नूतन संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत म्हणाले की संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे संघटन मजबूत करण्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली असून या जबाबदारीचे सोने करून संपूर्ण जिल्हा भगवा करू असे सांगितले आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…