करमाळा प्रतिनिधी करमाळा भूमि अभिलेख कार्यालयाच्या मनमानी कारभाराची चौकशी करुन सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी निवेदनाद्वारे दिला असुन याचे निवेदन तहसीलदार समीर माने यांना दिले आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की करमाळा भूमी अभिलेख कार्यालयामध्ये नविन मोजणी, वारस, नकाशा, उतारे करीता येणारे लोकांची अडवणूक व लुटमार केली जात आहे. त्या कार्यालयातील कर्मचारी कधीच टेबलावर बसलेले दिसत नाहीत. कोण आले की, चालले चहा पाण्याकरीता 10, 10 मिनटाला चहा पिण्यास जाण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये तास तास बसतात. दोन तीन तास सुध्दा कर्मचारी टेबलावर बसत नाहीत त्यामुळे नागरीकांना ताटकळत थांबावे लागत आहेत. कोणीच कोणाचे ऐकत नाही जा तो कर्मचारी अधिकारी झाल्याने नागरीकांची कुंचबना होत आहे. उदा. एकदा ग्रामस्थाचे मोजणी करावयाची असल्यास त्यास प्रथम चलन तयार करुन बँकेमध्ये भरण्यास सांगतात व चिरीमिरी घेतल्याशिवाय चलन बँकेमध्ये भरण्यास देत नाही. याबाबत संबंधीत अधिकारी यांना सांगितल्यास ते स्वत:ही म्हणतात की, काय असेल ते चहापाणी देवून टाकायचा. हे मुख्य अधिकारी हयानीच अवघड अथवा किचकट मोजणी करीता बेकायदेशीर पैसे स्विकारण्यास घेण्यासाठी आम्ही सांगतो. त्या हॉटेलमध्ये पैसे ठेवा अशा प्रकारे मागणी करतात मोजणीमध्ये, साधी मोजणी, तातडीची मोजणी, व अति तातडीची मोजणी हयाबाबत दर ठरेल असतानाही मन मानेल तसे पैसे घेऊन त्यांच्या सोयीनुसार मोजणी करतात व आमच्या ऑफीसमध्ये मशिन नाही मशिन बाहेर गावावरुन मागवावी लागेल त्याचे पैसे वेगळे दयावे लागले असे अधिकारी सांगतात. ज्यानी मोजणी रितसर अर्ज केले आहेत. त्यांची मोजणी वेळेमध्ये होत नाही.
महाराष्ट्रातील पहिले कार्यालय आहे जे फक्त दलालासाठी उघडे असते. एक महिला चार कर्मचारी दलालांचे काम करतात. दलालाच्या सोयीनुसार काम करुन पाहिजे तेवढे पैसे दलाला कडून उकळतात. हया विभागामध्ये कोणतेच काम नियमात केले जात नाही. काही कर्मचारी करमाळा येथील रहिवाशी असलेने ते कर्मचारी येणाऱ्या ग्रामस्थांना अरेरावीची भाषा वापरतात हया बाबत करमाळा तालुक्यातील नागरीकांना त्यांच्या मनमानी कारभाराला वैतागले असून नागरीकांना होणारा त्रास त्वरीत बंद करावा नाही तर महाराष्ट्र नव निर्माण सेना तीव्र आंदोलन करणार असल्याचे नानासाहेब मोरे मनसेशहराध्यक्ष यांनी म्हटले आहे.सदर निवेदनाच्या प्रती आमदार संजयमामा शिंदे जिल्हाधिकारी साहेब यांना पाठवलेल्या आहे.
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…