करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील शिवसेना मजबूत करण्यासाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी तन-मन धनाने काम करून खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांची सेवा करावी 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून गाव तिथे शाखा घर तेथे शिवसैनिक उपक्रम राबवावा असे आव्हान सोलापूर शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी केले.
शिवसेना शिंदे गटाच्या माढा विभाग उपजिल्हाप्रमुख पदी प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर अनिल पाटील तर करमाळा तालुका प्रमुख पदी मार्केट कमिटीचे माजी संचालक देवानंद बागल करमाळा शहर प्रमुख म्हणून संजय आप्पा शीलवंत उपतालुकाप्रमुख म्हणून प्रशांत नेटके दादासाहेब थोरात (जेऊर )उपशहर प्रमुख म्हणून नागेश गुरव काळे, राजेंद्र काळे निखिल प्रमोद भाऊ चांदगुडे युवा सेना उपजिल्हाप्रमुख वैभव मावलकर (झरे ) तालुकाप्रमुख राहुल कानगुडे शहर प्रमुख विशाल गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे या निवडीचे पत्र युवा सेनेचे राज्याचे सचिव किरण साळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक तानाजीराव सावंत शिवसेना जिल्हाप्रमुख महेशचिवटे यांच्या हस्ते देण्यात आले .सोलापूर येथे झालेल्या बैठकीत यांनी पत्रे देण्यात आलीयावेळी प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी शिवसेनेचे काम तळागाळापर्यंत पोहोचवा मी तुमच्या पाठीशी असून येणाऱ्या काळात करमाळा तालुक्यातील सर्व निवडणुका लढवण्यासाठी सज्ज राहावा असे आवाहन केले.करमाळा तालुक्यातील सर्व उपतालुकाप्रमुख शाखाप्रमुख जिल्हा परिषद गटप्रमुख पंचायत समिती गटप्रमुख आधी पदाधिकारी नेमण्यात येणार असून शिवसेना पक्षाचे काम करणारे इच्छुकांनी जिल्हाप्रमुख महेश महेश चिवटे व तालुकाप्रमुख देवानंद बागल यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील यांनी केले आहे.
करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी सोलापूर पश्चिमच्या जिल्हा चिटणीसपदी विनोद महानवर यांची निवड जिल्हाध्यक्ष चेतनसिंह…
करमाळा प्रतिनिधी करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांना रब्बी आवर्तना द्वारे शेतीसाठी उजनीतून पाण्याची पाळी देण्यात यावी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेशजी चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा शहर मंडल…
करमाळा प्रतिनिधी मस्साजोग (ता. केज, जि. बीड) गावचे लोकनियुक्त सरपंच कै. संतोष पंडितराव देशमुख यांची…
करमाळा प्रतिनिधी १५ ते २० देशांतून भ्रमंती करून ज्ञानसंग्रह करणारे राहुल रसाळ आणि गेल्या ५०…
माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…