अकलूज, बार्शी, पंढरपूर करमाळा येथे होणार दिव्यांगांना प्रमाणपञ वाटप       

करमाळा प्रतिनिधी               अकलूज, पंढरपूर, करमाळा व बार्शी परिसरातील ज्या दिव्यांग बांधवांनी दिव्यांग प्रमाणपञ मिळण्यासाठी आॕनलाईन अर्ज केले होते, परंतू ते प्रमाणपञ नेण्यासाठी येऊ शकले नव्हते त्यांना प्रमाणपञ देण्यासाठी शासनाकङुन राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या पंधरवङ्यामध्ये विशेष मोहीम राबवण्यात आली असल्याची माहीती जिल्हा शल्य चिकित्सक ङाॕ. प्रदीप ढेले यांनी दिली.

शनिवार दि. १७ सप्टेंबर ते रवीवार दि. २ आॕक्टोंबर २०२२ या कालावधीमध्ये राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा पंधरवङा साजरा करण्यात येतो आहे. यातिल दि. २२, २४, २८ व २९ रोजी बार्शी येथिल ग्रामिण रुग्णालयात, तर दि. २३, २७,३० व १ रोजी करमाळा, दि. २२, २७, २९ व १ रोजी पंढरपूर आणी दि. २३, २४, २८ व ३० रोजी अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपञाचे वाटप करण्यात येणार आहे.

सदर दिव्यांग प्रमाणपञ वाटप शिबीर हे अकलूज येथे. वैद्यकिय अधिक्षक, ङाॕ. महेश गुङे, बार्शी येथे वैद्यकिय अधिक्षक ङाॕ. सचिन कदम, पंढरपूर येथे वैद्यकिय अधिक्षक ङाॕ. महेश माने, करमाळा येथे वैद्यकिय अधिक्षक ङाॕ. अमोल ङुकरे यांच्या देखरेखीखाली पार पङत असून शिबिरामध्ये अस्थिरोग तज्ञ ङाॕ. निखिल मिसाळ, अकलूज आणी ङाॕ. भोसले, करमाळा हे काम पाहणार आहेत.

यावेळी सोबत येताना आॕनलाईन नोंदणी केलेली पावती, आधार कार्ङ, रेशन कार्ङ, पुर्वी उपचार घेतलेली सर्व कागदपञे घेऊन यावीत. दिव्यांगांना महत्वाची सुचना अशी की वरील चार ठिकाणी फक्त अस्थिव्यंग दिव्यांगांनाच प्रमाणपञे दिली जाणार आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

पुणे शिक्षक मतदार संघ कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक संघटनांचा निर्धार मुकुंद साळुंखे सर यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराला वेग

करमाळा प्रतिनिधी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षक संघटना, टीडीएफ आणि भारतीय जनता…

1 day ago

जिल्हा परिषद शाळांत पहिलीपासून सेमी इंग्रजीसाठी दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागाची आढावा बैठक आचारसंहिता संपल्यानंतर अंमलबजावणीला गती देण्याचे नियोजन;

; करमाळा प्रतिनिधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाची समान संधी मिळावी आणि जिल्हा परिषद शाळांमधील…

2 days ago

गाव तिथे भाजपा, बूथ तिथे शाखा’ अभियानाला सोलापूर ग्रामीण पश्चिममध्ये सुरुवात संघटनात्मक बांधणीला वेग भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांनी पांडे व धायखिंडी येथे भाजपा शाखांचे उद्घाटन

  करमाळा प्रतिनिधी  : भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिमच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर जिल्हाध्यक्ष…

2 days ago

प्राचार्य मिलिंद फंड यांना जीवनगौरव पुरस्कार पद्मश्री ‘बिजमाता’ राहिबाई पोपेरे यांच्या हस्ते सन्मान; वसंतराव दिवेकर स्मृतिदिनानिमित्त वसंत महोत्सव उत्साहात

करमाळा  प्रतिनिधी करमाळा येथील यशकल्याणी सेवाभवन येथे श्री. वसंतराव दिवेकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘वसंत…

3 days ago

करमाळ्यात झेडपी शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रमाचा विस्तार;* प्रस्ताव सादर करण्याचे भाजप नेते दिग्विजय बागल यांचे आवाहन

  करमाळा प्रतिनिधी, करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मराठी माध्यमासोबत इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम…

3 days ago