चिखलठाण येथील श्रीम.रा.बा सुराणा विद्यालयात कर्मवीर जयंती सोहळा संपन्न!

चिखलठाण प्रतिनिधी
चिखलठाण येथील श्रीम. रामबाई बाबुलाल सुराणा विद्यालय,येथे  दि.22/9/2022 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिम्मित प्रतिमापूजन व प्रतिमा मिरवणूक कार्यक्रम शाळेत पार पाडला. त्याचा उत्तरार्ध आज सभेच्या कार्यक्रमाने संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी विद्यालयातील स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य श्री संदिपान तात्याबा बारकुंड हे अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते श्री.गणेशभाऊ करे-पाटील हे होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती श्री.राजेंद्रकुमार बारकुंड स्थानिक स्कूल कमिटी तथा मा. जि.प.उपाध्यक्ष श्री धुळाभाऊ कोकरे, श्रीपाल गव्हाणे, चंद्रकांत सुरवसे,जैनुद्दीन सय्यद, अतुल मारकड, औदुंबर मोरे इ. मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी श्री धुळाभाऊ कोकरे अध्यक्ष,कोकरे आयलँड यांनी विद्यार्थ्यांना हनुमान जन्मभूमी कुगाव निबंध स्पर्धेसाठी एकूण 23000 रकमेची बक्षिसे विद्यार्थ्यांना दिली. तसेच श्री गणेश भाऊ करे पाटील संस्थापक अध्यक्ष यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था यांनी इयत्ता दहावीतील प्रथम तीन विद्यार्थ्यांना दरवर्षी एकूण रक्कम 6000 देणार असल्याचे घोषित केले. तसेच या वर्षी विद्यार्थ्यांना ती रक्कम रोख स्वरूपात बक्षीस वाटप केली. श्री बल्लाळ सर यांनी निबंध स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून वही पेन पेन्सिल शार्पनर वाटप केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री गुरुराज माने यांनी केले यानंतर विविध स्पर्धा परीक्षेतून यशस्वी झालेले विद्यार्थी यामध्ये एन.एम.एम.एस,सारथी,गांधी संस्कार परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षांमध्ये शिष्यवृत्ती धारक गुणवंत विद्यार्थ्यंचे उपस्थितांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले ग्रामस्थांमधून श्री.गव्हाणे श्रीपाल यांनी तसेच स्थानिक स्कूल कमिटी सदस्य व मा.जि.प. उपाध्यक्ष राजेंद्रकुमार बारकुंड यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यालयाच्या उत्तरोत्तर होत असलेल्या प्रगतीची प्रशंसा केली. प्रमुख वक्ते श्री गणेश भाऊ करे पाटील यांनी आपल्या भाषणातून कर्मवीरांनी सत्य आणि तळागाळातील समाजाला शिक्षित करण्यासाठी केलेले प्रयत्न अजरामर राहतील असे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांमधून श्री आत्माराम नेमाने, श्री बाळासाहेब कळसाईत, श्री प्रमोद गव्हाणे, श्री आकाश कांबळे, श्री भिमराव पवार यांचे विशेष सहकार्य लाभले.आभार प्रदर्शन विद्यालयाचे शिक्षक श्री.गोडगे.एल.व्ही यांनी केले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व सेवकांनी परिश्रम घेतले

saptahikpawanputra

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

12 hours ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

14 hours ago

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

2 days ago