सोलापूर प्रतिनिधी नागरिकांच्या कामांचा वेळेत निपटारा व्हावा म्हणून राज्य शासनाने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचे आयोजन केले आहे. प्रत्येक संबंधित विभागांनी ऑनलाईन पोर्टलवरील सेवांची माहिती घेऊन 2 ऑक्टोबर 2022 पर्यंत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.
सेवा पंधरवड्यानिमित्त विभागनिहाय प्रलंबित कामांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू हॉलमध्ये घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, तहसीलदार अंजली कुलकर्णी यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी श्री. शंभरकर यांनी सांगितले की, प्रत्येक विभागाने जनतेविषयीची कामे वेळेत पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येक विभागाने आपले सेवा पोर्टल, डीबीटी पोर्टल आणि आपल्या वैयक्तिक पोर्टलवर 10 सप्टेंबर 2022 पर्यंत आलेल्या तक्रारी, प्रलंबित अर्ज, निधीबाबत सेवा पंधरवड्यात निपटारा करावा. प्रत्येक विभागाने प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी शिबीरे आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
कृषी, शिक्षण, आयटीआय, समाज कल्याण, संजय गांधी निराधार योजना यांचे थेट ऑनलाईन लाभ लाभार्थ्यांना होत असल्याने पोर्टलवर प्रलंबित प्रकरणे ठेवू नयेत, असेही त्यांनी सांगितले.
तालुक्याला नेमणार उपजिल्हाधिकारी
सेवा पंधरवड्यात नागरिकांच्या अर्जांचा निपटारा व्हावा यादृष्टीने जिल्हास्तरावर आढावा सुरू आहे. त्याचपद्धतीने तालुकास्तरावर उपजिल्हाधिकारी नेमण्यात येणार आहेत. नेमून दिलेले उपजिल्हाधिकारी प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन सूचना करतील. 2 ऑक्टोबर 2022 पर्यंत नागरिकांची प्रलंबित कामे राहू नयेत, याची खबरदारी प्रत्येक विभागप्रमुखांनी घ्यावी, असेही श्री. शंभरकर यांनी सांगितले.
श्रीमती पवार यांनी सांगितले की, पोर्टलवर ऑनलाईन अर्ज, तक्रारी नसतील तर लेखी स्वरूपात आलेल्या अर्जांचाही निपटारा करावा. ऑनलाईन सेवा कोणत्या आहेत, याची माहितीही घ्यावी. आपले सेवा पोर्टल, महा-ई-सेवा केंद्र, सीएससी सेंटर याठिकाणी नागरिकांना शासकीय ऑनलाईन सेवा देण्यात येतात. याबाबतच्या सेवांची माहिती घ्यावी.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…