कृषि विभाग (आत्मा) सोलापूर, कृषि विज्ञान केंद्र बारामती  ग्रामपंचायत मांजरगाव च्या वतीने दुग्ध व्यवसायीकांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

 

केत्तूर (अभय माने ) महाराष्ट्र शासन – कृषि विभाग कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सोलापूर, कृषि विज्ञान केंद्र बारामती व ग्रामपंचायत मांजरगाव (ता. करमाळा ) यांचे सयुक्त विद्यमाने करमाळा तालुक्यातील पशुपालक शेतकरी यांचेसाठी कौशल्य आधारीत प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत *ओल्या चाऱ्यापासून मुरघास निर्मिती* या विषयावरील एक दिवसीय प्रत्यक्ष मुरघास निर्मिती कार्यशाळा/ प्रात्यक्षिक बुधवार (ता. 28/9/22 ) रोजी सकाळी ठिक 10 वाजता मौजे मांजरगाव येथे आयोजीत करण्यात आले आहे.
सदर कार्यशाळेसाठी कृषि विज्ञान केंद्र बारामती येथील तज्ञ शास्त्रज्ञ डॉ. रतन जाधव उपस्थित पशुपालक शेतकरी तसेच शेतमजूर यांना मुरघास तयार करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत तसेच प्रत्यक्ष मुरघास तयार करणे तसेच दुग्ध व्यवसाया मधुन जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल , मुरघासाचे दुग्ध व्यवसायातील महत्व या विषयी मार्गदर्शन करणार असुन मुरघास तयार करणे व त्याची साठवणूक याविषयी प्रात्यक्षिक करून दाखविले जाणार आहे. याबरोबरच कोर्टी येथील प्रगतीशील शेतकरी दुध उत्पादक तसेच दरवर्षी 100 टन मुरघास स्वतः तयार करणारे प्रगतीशील शेतकरी / पशुपालक श्री. श्रीमंत झाकणे हे सुद्धा उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन तसेच मुरघासाचे प्रात्यक्षिक करून दाखविणार आहेत. तरी मांजरगाव व परीसरातील शेतकरी बंधूंनी सदर कार्यशाळेस उपस्थित राहून मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन कृषि विभाग व मांजरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येत आहे.

या विषयी माहीती देताना सरपंच सौ.गायत्री कुलकर्णी म्हणाल्या कि
जे दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात पूर्णपणे सहभागी होऊन प्रशिक्षित होणार आहेत त्यांना प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केलेबाबत कृषि विभाग व कृषि विज्ञान केंद्र बारामती यांचे वतीने सर्टिफिकेट दिले जाणार आहे याची नोंद घ्यावी. तसेच या प्रमाण पत्राचा उपयोग भविष्यामध्ये कर्जप्रकरण तसेच शासकीय योजनांसाठी होऊ शकतो म्हणुन पचक्रोशीतील सर्व पशुपालक शेतकरी यांनी हे प्रशिक्षण पूर्ण करून यशस्वी पशुपालक बनुन आपली अर्थिक प्रगती साधावी असे आवाहन केले आहे.

 

 

saptahikpawanputra

Recent Posts

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

8 hours ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

21 hours ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

24 hours ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

1 day ago

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

  करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…

3 days ago