लम्पीच्या सावटाखाली बैलपोळा घरच्या घरी साजरा

 

केत्तूर (अभय माने) लम्पी स्किनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील तसेच उजनी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी बैलपोळा सण आज रोजी रविवार (ता.25 ) रोजी साध्या पद्धतीनेच साजरा केला.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष बैलपोळा सण साध्या पद्धतीने साजरा करावा लागला होता.यावर्षी लम्पीच्या संकटामुळे तो साध्या पद्धतीने साजरा करावा लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यातून मात्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

करमाळा तालुक्याशेजारील नगर जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढत आहे. खबरदारी म्हणून करमाळा पशुसंवर्धन खात्याने तालुक्यातील बैलपोळा घरच्या घरी साजरा करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना व पशुपालकांना केले होते. त्याला प्रतिसाद देत तालुक्यातील पशुपालकांनी घरच्या घरीच गोठ्यातच गुरांढोराना रंगरंगोटी,आकर्षक सजावट केली व त्यानंतर सगळ्यांची पूजाअर्चा करून बैलपोळा सण साजरा केला.

saptahikpawanputra

Recent Posts

सोलापूर जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल शंभूराजे जगताप यांचा टीडीएफतर्फे गौरव टीडीएफचे पुणे विभागीय उपाध्यक्ष मुकुंद साळुंखे सर यांच्या हस्ते सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जयवंतराव जगताप यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी…

9 hours ago

सांगोल्यातील डॉ.धनाजी जगताप व डॉ.सारिका जगताप यांच्या गोदावरी हॉस्पिटलमध्ये लहान मुलांवर मोफत शस्त्रक्रिया व मोफत औषध उपचार

सांगोला प्रतिनिधी सांगोला शहरातील प्रसिद्ध असलेल्या डॉ. धनाजी जगताप व डॉ. सारिका जगताप यांच्या हॉटेल…

18 hours ago

करमाळ्याच्या मातीतील रंगांचा दिल्लीच्या क्षितिजावर आविष्कार… चित्रकार निवास कन्हेरे यांचे ‘Prismatic Resonances’ चित्रप्रदर्शन; २३ नोव्हेंबरपासून राजधानीत कलात्मक पर्वणी

  करमाळा  प्रतिनिधी ग्रामीण मातीतील संवेदना, मानवी भावविश्व आणि सर्जनशीलतेला आपल्या कुंचल्यातून वैश्विक ओळख मिळवून…

18 hours ago

करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी तात्यासाहेब जाधव यांची बिनविरोध निवड व्हा. चेअरमनपदी निशांत खारगे, तर सचिवपदी अजित कणसे यांची निवड

  करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. तात्यासाहेब जाधव यांची, तर…

1 day ago

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

करमाळा (प्रतिनिधी): सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात…

2 days ago