राजुरी प्रतिनिधी लंम्पी आजारांमुळे एका जर्सी गायींचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.राजुरी येथील निलेश दुरंदे यांची दिड लाख किंमतीची जर्शी गायचा लंम्पी आजाराने मृत्यु झाला.पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे गायीचा मृत्यू झाल्याचा संबंधित शेतक-याने आरोप केला आहे. याबाबत शेतकरी निलेश दुरंदे यांनी पशुवैद्यकीय यंञेणवर नाराजी व्यक्त केली आहे.याबाबत बोलताना निलेश दुरंदे म्हणाले,ता.11 सप्टेंबर पासुन दुरंदे यांची जर्सी गाय आजारी होती.यानंतर डाॅक्टरांनी उपचार सुरू केले. आठ दिवस उपचार केल्यानंतरही फरक पडला नाही त्यानंतर ता.18 रोजी गाईच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले मात्र गायीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतल्यानंतर पाच दिवसांनी रिपोर्ट आला यामध्ये गाईला लंम्पी आजाराची लागण झाल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे सोमवार रोजी सकाळी गायींचा मृत्यू झाला आहे .गाईला योग्यवेळी योग्य उपचा मिळण्यास उशीर झाल्यानेच गायीचा मृत्यू झाला आहे .याला जबाबदार कोण ? साधारणपणे एक ते दीड लाखाचे नुकसान यामुळे झाले आहे .लंम्पी आजारामुळे जनावरे दगावण्याच्या तालुक्यात हा पहिला प्रसंग आहे.राजुरी ता करमाळा येथील नीलेश दुरंदे यांची जर्सी गायी गेली दहा दिवसांपासून आजारी होती .गाईवर ती उपचार करण्यात येत होते मात्र उपचाराला प्रतिसाद न दिल्याने या जर्सी गायींचा मृत्यू झाला .राजुरी गावात साधारण सहा ते सात जनावरे लंपी सदृश्य आजाराने आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे.राजुरी येते लंम्पी आजाराने जर्सी गायींचा मृत्यू झाल्याचे समजताच शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यात सध्या लंम्पी आजारावर लसीकरण करण्याचे काम काही ठिकाणी सुरू आहे गेल्या पंधरा दिवसांत तालुक्यातील अनेक ठिकाणांहून लंम्पी आजाराचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते मात्र यामध्ये लंम्पी सदृश्य आजाराचे एकही जणांवर आढळून आले नव्हते
करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात रविवार ता.25 रोजी भाद्रपद पोळा साजरा करण्यात आला पोळ्याच्या सणानिमित्त अनेक ठिकाणी जनावरे एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले त्यातच राजुरी येथे लंम्पी आजाराने जर्सी गाईचा मृत्यू झाल्याने शेतकर्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.याबाबत तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण शिंदे यांना संपर्क साधला असता त्यांनी शेतकरी नीलेश दुरंदे यांचा मृत्यू झालेल्या जर्सी गायीची पाहणी केल्यानंतर माहिती देतो असे सांगितले.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…