करमाळा सध्या कोळगाव धरण लाभक्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्यामुळे कोळगाव धरण 25 सप्टेंबर च्या मध्यरात्रीपासून ओव्हर फ्लो झाले असून त्या धरणांमधून ओव्हर फ्लो चे पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे .या पार्श्वभूमीवर धरणातून वाहून जाणारे ओव्हर फ्लोचे पाणी करमाळा तालुक्यातील गौंडरे व नेरले तलावात सोडण्यात यावे अशी मागणी करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी उस्मानाबाद पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे.
याविषयी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आवाटी शाखा कालवा दुरुस्त करून नेरले तलावात पाणी सोडण्यात यावे. श्री महादेव धोंडे यांचे शेताजवळील मातीकाम प्रत्येक पावसाळ्यामध्ये वाहून जात आहे. कालवा फुटणे , शेतकऱ्यांची शेती वाहून जाणे असे २० वर्षापासून नुकसान होत आहे. सदर शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत नुकसान भरपाई न दिल्यामुळे त्यांनी फुटलेल्या कालव्याचे काम अडवले आहे .त्यामुळे सद्यस्थितीत नेरले तलावात पाणी सोडणे जिकिरीचे झाले आहे.
सन 2022 च्या अखेर पर्यंत सदर कॅनॉलचे अस्तरीकरण करून आवाटी शाखा कालवा १ ते १५ किमी गाळ , झाडे-झुडपे काढून नेरले तलावात पूर्ण दाबाने पाणी पोहोचण्याच्या दृष्टीने योग्य ती उपाययोजना करावी .
कोळगाव धरण ओव्हर फ्लो झाल्यानंतर आज सकाळी आ. संजयमामा शिंदे यांनी अधीक्षक अभियंता यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे चर्चा केली असता लवकरच कोळगाव धरणावरून करमाळा बाजूकडील उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून नेरले व गौंडरे येथील तलावात पाणी सोडण्यात येईल अशी माहिती अधिक्षक अभियंता यांनी दिली आहे.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…