आई कमलाभवानीची माही डेकारेशनच्या माध्यमातुन नवरात्रीचा पुष्प सेवा केल्याचे समाधान – मंगेश‌ गोडसे

करमाळा प्रतिनिधी करमाळ्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री कमला भवानी मंदिर येथे आज पुष्प सजावट करण्याची मला संधी मिळाली येथून प्रत्येक दिवसाला वेगवेगळया रंगाच्या नऊ दिवस नवरात्रीच्या शेवटच्या माळेला अत्यंत आकर्षक पुष्प सजावट करणार असा विश्वास माही डेकोरेशनचे मालक मंगेश गोडसे यांनी व्यक्त केला आहे. मंगेश गोडसे यांचा कमलादेवी भक्तगणांचे वतीने व करमाळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला मंगेश गोडसे हे कमला देवीचे प्रचंड भक्त असून त्यांनी गेल्या वर्षी स्वखर्चातून जवळपास एक हजार किलो झेंडूची फुले वापरून तसेच गुलाब जर बिया शेवंती अशा फुलांचा वापर करून आपल्या जवळपास वीस कार्यकर्त्यांच्या सहकार्याने कमलादेवी मंदिरातला पुष्प सजावट.मा श्री बाळासाहेब बाबा गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे .यावेळी देवीचामाळ ग्रापंचायतीचे माजी सरपंच दादा पुजारी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे अशोक नरसाळे नासिर कबीर सचिन जव्हेरी दिनेश मडके सिद्धार्थ वाघमारे निलेश चव्हाण व्यवस्थापक अशोक गाठे उपस्थित होते शाल-श्रीफळ देवीच्या प्रतिमेची प्रतिकृती देऊन मंगेश गोडसे यांचा सत्कार करण्यात आला होता ही सजावट करण्यासाठी ओंकार राऊत अनुराग कंरडे अशोक गोळे रोहित पवार आकाश गरड सागर जाधव समाधान गोळे सागर गोळे सोनु जाधव काम करीत आहे गेल्या वर्षी जवळपास अंदाजे एक लाख रुपये खर्च आला होता कोरोना योद्धा ही फुलातून काढलेली प्रतिमा आकर्षणाचे केंद्र ठरले होते यावेळी समाज ग्रामपंचायतीच्या वतीने दादा पुजारी सर कमलाभवानी देवी ट्रस्टच्या वतीने व्यवस्थापक अशोक गाठे यांनी गोडसे यांचा सत्कार करण्यात आला यंदाच्या वर्षी कोरोनाचे सावट दुर झाले असल्याने नवरात्री नऊ रंगाचे आकर्षक डेकोरेशन करण्यात येणार असल्याचे माही डेकारेशनचे मंगेश गोडसे यांनी सांगितले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago