मांगी तलाव पुर्ण क्षमतेने भरल्यामुळे कुकडीचे पाणी सोडण्यासाठी केलेल्या आंदोलनाचे यश – दिग्विजय बागल

करमाऴा प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या हितासाठी कुकडीचे पाणी मांगी तलावात सोडावे यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याने सामूहिक आंदोलन केले होते त्या आंदोलनाचे फलित म्हणजे मांगी तलावात कुकडीचे पाणी मांगी तलावात महिनाभरापासुन पाणी सोडल्यामुळे मांगी तलाव आता पुर्ण क्षमतेने शंभर टक्के भरला असून आता शेतकऱ्याला दोन वर्षे तरी काळजी करण्याचे कारण नाही असे मत मकाईचे चेअरमन बागल गटाचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी व्यक्त केले. मांगी तलाव शंभर टक्के पूर्ण भरल्यामुळे मांगी तलावाच्या पाण्याचे पूजन दिग्विजय बागल यांच्या हस्ते व पंचक्रोशीतील नागरिकांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले यावेळी बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांची घोड्यावरुन मिरवणुक काढण्यात आली मांगी तलावामधून मांगी, पोथरे, बिटरगाव श्री, निलज, करंजे, खांबेवाडी, अर्जुननगर, मिरगव्हाण, बोरगाव, रायगाव, वडगाव, पूनवर, हिवरवाडी, भोसे यासह परिसरातील २० ते २५ गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. येथील उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.    यावेळी  आदिनाथ कारखान्याचे संचालक प्रकाश पाटील,भोसेचे बागल गटाचे जेष्ठ मार्गदर्शक निवृती सुरवसे सर,आदिनाथ कारखान्याचे मा संचालक दिनेश भांडवलकर शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख देवानंद बागल, पोथरेचे मा.सरपंच हरिश्चंद्र झिंजाडे शिवशंकर जगदाळे, शांतीलाल झिंजाडे, रघुवीर जाधव, सोपानकाका शिंदे ,छगन शिंदे,उपसरपंच नवनाथ बागल ,मांगीचे सरपंच प्रतिनिधी आदेश बागल, विष्णु रंदंवे अजिनाथ खटके, आप्पा नरसाळे, तात्या बागल,चंद्रकांत काळे विकास रोकडे उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

4 hours ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

8 hours ago

आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ झरे येथे ५२५ गणेशमूर्तींचे मोफत वाटप* *सुनील बळवंत झरे यांच्या उपक्रमाचे सहावे वर्ष गणेशमूर्ती घेण्यासाठी ग्रामस्थांची उत्स्फूर्त गर्दी

करमाळा प्रतिनिधी आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ धार्मिक व सामाजिक बांधिलकी जपत झरे (ता. करमाळा) येथील सुनील बळवंत…

10 hours ago

संगमेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांचा दुहेरी गौरव जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारांनी सन्मान

करमाळा  प्रतिनिधी श्री संगमेश्वर विद्यालय, संगोबा (ता. करमाळा)चे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय…

11 hours ago

आपलं गाव- आपला विकास, गाव भेट दौऱ्याच्या माध्यमातुन करमाळा पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजित विघ्ने यांच्या अनोख्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक

करमाळा प्रतिनिधी जिल्हा परिषद/ पंचायत समितीच्या निवडणुका मध्यंतरी पार पडल्या असुन, अनेक नवीन होतकरू नेतृत्वांना…

11 hours ago