करमाळा तालुक्यातील ढोकरी येथील महादेव बंडगर यांच्या केळीला महाराष्ट्रात उच्चांकी 29.50 रुपयाचा दर प्राप्त करुन इरानला निर्यात

करमाळा प्रतिनिधी – करमाळा तालुक्यातील ढोकरी येथील केळी उत्पादक शेतकरी महादेव ज्ञानदेव बंडगर यानी आपल्या केळीला 29 रूपये 50 पैसे इतका राज्यातील उच्चांकी दर प्राप्त केला असून त्यांची केळी आखाती देशात इराण ला निर्यात होत आहे . राज्यातील या उच्चांकी दाराची सर्व दूर चर्चा आहे .

उजनी धरणामुळे पुनर्वसीत ढोकरी ता करमाळा येथील बंडगर वस्ती परिसरात गट नंबर 110 मधे करमाळा तालुका क्रषी उत्पन्न बाजार समिती करमाळा चे सभापती प्रा शिवाजी बंडगर यांचे बंधू महादेव बंडगर यानी पाच एकर क्षेत्रात केळीची लागवड केली असून त्यातील दोन एकरातील लागण ( सुरू ) कालपासून काढायला सुरू झाली. त्यातील पहिली गाडी इराण ला निर्यातीसाठी गेली आहे . याचा दर उच्चांकी 29 रूपये 50 पैसे प्रमाणे बंडगर यांना प्राप्त झाले.

महादेव बंडगर दहा बारा वर्षे पासून सतत केळी चे पीक घेतात. वांगी परिसरात अगदी सुरुवातीला केळी उत्पादण करणार्या शेतकर्या मधे त्यांची गणना होते. ते केळी पिकांचे संगोपण करताना लागणीचे टायमिंग, रोपे,लागवड पद्धत, खते,औषधे, पाणी, यांचं नीट नेटकं नियोजन करतात. त्यामुळे वांगी परिसरातील अनेक शेतकरी त्यांचा सल्ला घेतात.

तालुक्यातील शेटफळ येथील स्थानिक व्यापारी तुषार गुटाळ यानी सार्थक ॲग्रो, केरळ या केळी खरेदी कंपनी ला ही केळी दिली आहे . काल तुषार गुटाळ, कंपनी चे संचालक सनी इंगळे, व जी 5 या बेंगलोर येथील सह कंपनीचे शब्बीर केफी ,मरफील मेरूफ यानी बंडगर यांच्या प्लाॅट ला समक्ष भेट दिली. यावेळी महादेव बंडगर, वांगी सोसायटी चे उपाध्यक्ष भैरवनाथ बंडगर, यांनी त्यांचे स्वागत केले.

बंडगर बंधू च्या या विक्रमी दराचे सर्वत्र कौतुक होत असून ढोकरी ग्रामस्थांनी या यशाबद्दल तोफा उडवून आनंद साजरा केला.

दहा बारा वर्षे पासून आम्ही केळी उत्पादीत करतो . परंतु इतका मोठा दर प्रथमच मिळाला असल्याने खूप आनंद आहे . रात्री अपरात्री अनंत अडचणींना तोंड देत कष्ट केले . उच्चांकी दर मिळाल्याने समाधान तर वाटतेच पण आत्मविश्वास दुणावला आहे.

महादेव बंडगर, केळी उत्पादक शेतकरी, ढोकरी , तालुका करमाळा

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago