करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याचे विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे व संचालक बाळासाहेब पांढरे यांनी सपत्नीक बॉयलर पूजन केले. या हंगामात विक्रमी ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून कारखाना व्यवस्थित चालावा यासाठी नियोजन करण्यात आले आहे. यंदा बॉयलर पूजन लवकर झाल्याने हंगामही लवकर सुरू होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
श्री मकाईने गेल्या हंगामात ३.१६ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले. कठीण काळात हंगाम यशस्वी झाला तसाच हा हंगाम यशस्वी करू, असा विश्वास श्री मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी व्यक्त केला आहे. यंदा आम्ही विक्रमी ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखाना व्यवस्थित चालवण्यासाठीचे सर्व नियोजन केले असल्याचे बागल यांनी सांगितले.
बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल म्हणाल्या, मकाई कारखाना ही लोकनेते दिगंबरराव बागल मामा यांची आपल्या तालुक्याला दिलेली एक भेट आहे. तालुक्याचा अतिरिक्त उसाचा प्रश्न पाहता तालुक्याच्या पश्चिम भागात मामांनी ‘मकाई’ची उभारणी केली. यावेळी संचालक महादेव गुंजाळ, नंदकुमार भोसले, महादेव सरडे, संतोष देशमुख, दत्तात्रय गायकवाड, संतोष पाटील, गोकूळ नलवडे, बापू कदम, बाळासाहेब सरडे, रघुनाथ फडतरे,आशिष गायकवाड, माजी संचालक काशिनाथ काकडे, रणजित शिंदे, विकास रोकडे यावेळी उपस्थित होते. कारखान्याचे कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे यांनी प्रास्ताविक केले तर आभार संचालक संतोष देशमुख यांनी मानले.