श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे बाॅयलर पुजन विलासराव घुमरे सर यांच्या हस्ते संप्पन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याचे विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे व संचालक बाळासाहेब पांढरे यांनी सपत्नीक बॉयलर पूजन केले. या हंगामात विक्रमी ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून कारखाना व्यवस्थित चालावा यासाठी नियोजन करण्यात आले आहे. यंदा बॉयलर पूजन लवकर झाल्याने हंगामही लवकर सुरू होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
श्री मकाईने गेल्या हंगामात ३.१६ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले. कठीण काळात हंगाम यशस्वी झाला तसाच हा हंगाम यशस्वी करू, असा विश्वास श्री मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी व्यक्त केला आहे. यंदा आम्ही विक्रमी ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखाना व्यवस्थित चालवण्यासाठीचे सर्व नियोजन केले असल्याचे बागल यांनी सांगितले.
बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल म्हणाल्या, मकाई कारखाना ही लोकनेते दिगंबरराव बागल मामा यांची आपल्या तालुक्याला दिलेली एक भेट आहे. तालुक्याचा अतिरिक्त उसाचा प्रश्न पाहता तालुक्याच्या पश्चिम भागात मामांनी ‘मकाई’ची उभारणी केली. महादेव गुंजाळ, नंदकुमार भोसले, महादेव सरडे, संतोष देशमुख, दत्तात्रय गायकवाड, संतोष पाटील, गोकूळ नलवडे, बापू कदम, बाळासाहेब सरडे, रघुनाथ फडतरे,आशिष भैय्या गायकवाड, माजी संचालक काशिनाथ काकडे, रणजित शिंदे, विकास रोकडे यावेळी उपस्थित होते. कारखान्याचे कार्यकारी संचालक हरिश्‍चंद्र खाटमोडे यांनी प्रास्ताविक केले तर आभार संचालक संतोष देशमुख यांनी मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला करमाळ्यात भव्य रक्तदान शिबीर

करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…

10 hours ago

जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना; १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार-पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…

14 hours ago

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

20 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

1 day ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

1 day ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

2 days ago