सालसे प्रतिनिधी : – सालसे ता. करमाळा येथे आज पशु संवर्धन विभाग व ग्रामपंचायत सालसे आणि अभिनव भारत समाज सेवा मंडळ सालसे यांच्या संयुक्त विदयमाने मोफत लम्पी रोगाचे लसीकरण ग्रामपंचायत समोर घेण्यात आले, सालसे गावचे सरपंच सतीश आहोळ यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून व गो मातेची पुजा करून लसीची सुरवात करण्यात आली यावेळी पशुधन विकास अधिकारी वर्ग एक साडे डॉक्टर हेमंत अनारसे व डाँ.बारकुंड यांनी लसीकरण केले या सोबत सालसे ,साडे, आळसूंदे,घोटी व वरकुटे या गावात जनावरांना लसीकरण केल्याचे डाँ. हेमंत अनारसे यांनी सांगीतले, यावेळी सालसे गावचे प्रथम नागरीक सतीश ओहोळ, ग्रामसेवक अनिल कब्जेकर , अभिनव भारत समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष संतोष राऊत ,गोकुळ पवार , बबन मेंगडे, नागनाथ ओहोळ भाऊ घाडगे,बबन लोकरे, शुभम रुपनर, नामदेव कोळी सह ग्राम स्थ ऊपस्थित होते
करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…
करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…
करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…
* करमाळा प्रतिनिधी : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त करमाळा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…
करमाळा प्रतिनिधी गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव म्हणून साजरा होत…
करमाळा प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे…