करमाळा प्रतिनिधी
सरपंच हा गावच्या व्यवस्थेचा कणा असतो. सरपंचाने ठरवलं तर गावाचा कायापालट होऊ शकतो याची अनेक उदाहरणे राळेगण सिद्धी व हिवरे बाजारच्या रूपाने आपल्यासमोर आहेत .असे प्रतिपादन सरपंच परिषदेचे राज्य सरचिटणीस ऍड. विकास जाधव यांनी केले. करमाळा येथील पंचायत समिती सभागृहात सरपंच संवाद अभियान अंतर्गत करमाळा तालुक्यातील सरपंचांचा मेळावा पार पडला यावेळी ऍड जाधव बोलत होते.
देशाच्या पंतप्रधान इतकेच गाव पातळीवर सरपंचाचे अधिकार आहेत ,मात्र यासाठी सरपंचांनी एकत्र येऊन आपल्या गावाच्या समस्या प्रशासनापुढे मांडल्या पाहिजेत तरच खेडी सुधारतील. गावचा कारभार करत असताना सरपंचांनी कोणत्या प्रकारचे राजकारण न करता सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य देऊन ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलता बदलावा असे आवाहन ही त्यांनी केले. जनतेतून सरपंच निवड योग्य असून सरपंचातून एक लोकप्रतिनिधी निवडावा यासाठी सरपंच परिषदेच्या मार्फत पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक चंद्रकांत सरडे, सरपंच परिषदेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष आदिनाथ देशमुख, तालुका अध्यक्ष डॉक्टर अमोल दुरंदे ,पांडे च्या ग्रामपंचायत सदस्य सौ.शीतल क्षिरसागर आदि उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेच्या करमाळा तालुकाच्या नवनियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये तालुका समन्वयक पदी सुजित बागल ( ग्रामपंचायत सदस्य, मांगी )व भोजराज सुरवसे ( माजी सरपंच, भोसे )व सौ शितल शिरसागर( ग्रामपंचायत सदस्य, पांडे ),उपाध्यक्षपदी adv.दत्तात्रय सोनवणे( सरपंच, पांगरे ), सरचिटणीसपदी सतीश आहोळ ( सरपंच, सालसे ), सचिव पदी मदन पाटील (सरपंच, पिंपळवाडी), सहसचिवपदी विक्रम धायतोंडे (सरपंच, रोशेवाडी) यांची निवड करण्यात आली. पुढील महिन्यातील आढावा मिटींगला राहिलेल्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. यावेळी करमाळा तालुक्यातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सरपंच प्रतिनिधी व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सरपंच डॉ.अमोल दुरंदे यांनी केले तर आभार पिंपळवाडी चे सरपंच मदन पाटील यांनी मानले.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…