श्री कमलाभवानी ब्लड बँकेचे रक्तदान शिबिरे घ्या-आमदार सचिन कल्याण शेट्टी

 

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्या सारख्या ग्रामीण भागात श्री कमला भवानी ब्लड बँकेची झालेली उभारणी रुग्णांसाठी आधार केंद्र बनली असून ही रक्तपेढी मजबूत करण्यासाठी सर्व सामाजिक संघटना यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर घेऊन करमाळ्यातील रक्ताची गरज करमाळ्यातच भागवावी असे आव्हान अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले.ब्लड बँकेचे संचालक दीपक पाटणे स्वातंत्र्यसैनिक मनोहरपंत चिवटे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक महेश चिवटे चेअरमनब्ल बँक समन्वयक व्हाईस चेअरमन गणेश चिवटे व्यवस्थापक निलेश पाटील यांनी आमदार कल्याण शेट्टी यांचे स्वागत केले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल शिवसेनेचे तालुकाध्यक्ष देवानंद बागल उपाध्यक्ष प्रशांत नेटके शेअर प्रमुख संजयशीलवंत उपशहर प्रमुख नागेश काळे युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे वैद्यकीय सहाय्यक विनोद महानवर नागेश शेंडगे रोहित रोहित वायबसे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील युवा सेना तालुका प्रमुख राहुल कानगुडे शहर प्रमुख विशाल गायकवाड भाजपचे किरण बोकन जितेश कटारिया सचिन चव्हाण जयंत काळे रामा ठाणे अफसर जाधव फोटोग्राफर कुंभार आदी पदाधिकारी उपस्थित होते

यावेळी आमदार कल्याण शेट्टी यांनी ब्लड बँकेची पाहणी करून समाधान व्यक्त केले यावेळी पुढे बोलताना कल्याण शेट्टी म्हणाले की रक्तदान हे जगात सर्वात श्रेष्ठ दान असून सर्व जाती-धर्माचे बंधने तोडून रक्त एकमेकाला देऊन एकमेकाचा प्राण वाचू शकतो यासाठी आता करमाळातील श्री कमला भवानी ब्लड बँक मजबूत करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर असून या भागात जास्तीत जास्त रक्तदान शिबिरे घेऊन या ब्लड बँकेचा पाया मजबूत करावा असे आवाहन केले

आगामी काळात या ठिकाणी शिवसेना शिंदे गट व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे आरोग्याचे प्रश्न सोडवावेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातून सर्व प्रकारची मदत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे असे आश्वासन दिले.यावेळी बोलताना महेश चिवटे म्हणाले की या ब्लड बँकेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांचे मोठे सहकार्य लाभले असून येणाऱ्या पंधरा दिवसात  डायलिसिस सेंटर सुरू करण्यात असल्याचा विश्वास व्यक्त केला.

saptahikpawanputra

Recent Posts

शिवस्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही : पालकमंत्री जयकुमार गोरे करमाळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन; भव्य भगवा ध्वज उभारण्यासाठीही निधी देण्याची घोषणा

करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरात साकारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह शिवस्मारकाच्या कामासाठी निधीची…

9 hours ago

कै. डॉ. प्रदीपकुमार जाधव-पाटील यांच्या रुग्णसेवेच्या वारशाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड करमाळ्यात अत्याधुनिक कॅथलॅब सुरू; पाटील कुटुंबीयांचा उपक्रम स्तुत्य : पालकमंत्री जयकुमार गोरे

करमाळा प्रतिनिधी कै. डॉ. प्रदीपकुमार जाधव-पाटील यांच्या रुग्णसेवेचा वारसा पुढे नेत करमाळ्यात जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक…

10 hours ago

गणेशोत्सवानिमित्त राशीनपेठ तरुण मंडळाचा अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण, प्रवचन, कीर्तन दिंडी सोहळा महाप्रसादाचे आयोजन

* करमाळा प्रतिनिधी करमाळ्याचा राजा राशीनपेठ तरुण सेवा मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह…

17 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

2 days ago