सिना कोळेगाव प्रकल्पाचे पाणी करमाळा तालुक्यातील नेरले तलावासाठी आजपासून सुरू-आमदार संजयमामा शिंदे

करमाळा प्रतिनिधी
सिना कोळेगाव प्रकल्प प्रत्येक वर्षी शंभर टक्के भरततोच असे नाही. त्यामुळे या प्रकल्पावरती आधारित असलेली करमाळा बाजूकडील उपसा सिंचन योजना वर्षानुवर्षे बंद स्थितीमध्ये राहते. परंतु 2020 पासून धरण 100% भरल्यामुळे 2020 व 2021 मध्ये कोळगाव धरणाचे ओव्हर फ्लो पाणी नेरले व गौंडरे येथील तलावाला दिले होते . यावर्षीही म्हणजे 2022 मध्ये कोळगाव धरण ओव्हर फ्लो झाल्यामुळे या धरणातून नेरले तलावासाठी आजपासून पाणी सुरू करण्यात आले असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.
2017 पासून जवळपास 4 वर्ष ही योजना बंद होती . थकित वीज बिलामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने या योजनेसाठी चा विद्युत पुरवठा खंडित केलेला होता. जलविद्युत विभाग, यांत्रिकी विभाग यांची उपकरणे वर्षानुवर्षे बंद स्थितीत असल्यामुळे अतिशय खराब परिस्थितीमध्ये होती. सिव्हिल विभागाचा कॅनॉल पावसाच्या पाण्यामुळे फुटला होता . झाडे झुडपे वाढल्यामुळे तसेच भूसंपादनाचे पैसे मिळाले नाहीत, रहदारीसाठी पूल बनवलेला नाही यामुळे लोकांनी जागोजाग कॅनॉल बुजलेला होता. अशा स्थितीत कोळगाव प्रकल्पाचे पाणी करमाळा तालुक्यासाठी मिळविणे म्हणजे दिवास्वप्नच होते.
परंतु सिना कोळेगाव प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना तालुक्याचे आ. संजयमामा शिंदे यांनी कोणत्याही परिस्थितीत योजना कार्यान्वित करा व वाहून जाणारे पाणी लाभ क्षेत्रातील गावांना द्या अशा सूचना दिल्या होत्या . तुम्हाला जिथे कुठे अडचण असेल तिथे मला किंवा माझ्या कार्यकर्त्यांना सांगा. तुमच्या अडचणी सोडवू .परंतु माझ्या तालुक्यातील गावांना कोळगाव प्रकल्पाचे पाणी मात्र प्राधान्याने मिळाले पाहिजे असे सूचित केले होते.
त्यानुसार संबंधित विभागांनी वीज बिल भरणा करण्यापासून ते कॅनल दुरुस्ती , पंपांची दुरुस्ती , वीज पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांची दुरुस्ती युद्धपातळीवरती पूर्ण करून कोळगाव प्रकल्पाचे ओव्हर फ्लो पाणी 2020 पासून करमाळा तालुक्यातील नेरले तलावासाठी दिले जात आहे. नेरले तलावातील पाण्याचा लाभ नेरले या गावाबरोबरच सालसे , आळसुंदे व वरकुटे या गावातील शेतकऱ्यांनाही या पाण्याचा फायदा होत असतो. नेरले तलावावरती जवळपास 1 हजार हेक्टर उसाची लागवड अवलंबून आहे .आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून नेरले तलावाला पाणी सुरू झाल्यामुळे या भागातील शेतकरी समाधान व्यक्त करून आमदार शिंदे यांचे आभार मानत आहेत.
या कार्यक्रमाचे उद्घाटन आज 1 ऑक्टोबर रोजी गौंडरे चे माजी सरपंच सुभाष हनपुडे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी नेरले गावचे युवा नेते माजी उपसरपंच काकासाहेब पाटील, कोळगाव प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी एस. जी. चौगुले, शाखा अभियंता डी. आर. कांबळे आदी उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 hours ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

6 hours ago

आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ झरे येथे ५२५ गणेशमूर्तींचे मोफत वाटप* *सुनील बळवंत झरे यांच्या उपक्रमाचे सहावे वर्ष गणेशमूर्ती घेण्यासाठी ग्रामस्थांची उत्स्फूर्त गर्दी

करमाळा प्रतिनिधी आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ धार्मिक व सामाजिक बांधिलकी जपत झरे (ता. करमाळा) येथील सुनील बळवंत…

8 hours ago

संगमेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांचा दुहेरी गौरव जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारांनी सन्मान

करमाळा  प्रतिनिधी श्री संगमेश्वर विद्यालय, संगोबा (ता. करमाळा)चे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय…

9 hours ago

आपलं गाव- आपला विकास, गाव भेट दौऱ्याच्या माध्यमातुन करमाळा पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजित विघ्ने यांच्या अनोख्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक

करमाळा प्रतिनिधी जिल्हा परिषद/ पंचायत समितीच्या निवडणुका मध्यंतरी पार पडल्या असुन, अनेक नवीन होतकरू नेतृत्वांना…

9 hours ago