करमाळा प्रतिनिधी शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने तमाम हिंदू बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या आई कमलादेवी मंदिर करमाळा येथे विश्वरत्न हजरत मोंहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्ताचे औचित्य साधून कमला देवी मंदिर करमाळा येथे भाविकांना केळी व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी ॲड राहुल सावंत ( माजी पंचायत समिती सदस्य करमाळा) संजय (पप्पू) सावंत (माजी नगरसेवक करमाळा नगरपालिका).युवा नेते अमीरशेठ तांबोळी , ॲड नईम काझी, फारुक भाई जमादार,हाजी फारुक बेग,सुरज शेख,आशपाक पठाण,पिंटु बेग, जहाँगीर बेग,यांच्या शुभहस्ते व उपस्थितीत संपन्न झाला आहे. याप्रसंगी कमलादेवी मंदिराचे विश्वस्तांनी करमाळा मुस्लिम समाज चे या उपक्रमाबद्दल कौतुक व आभार व्यक्त केले आहे.हिंदु व मुस्लिम बांधवांनी प्रत्येक सणाच्या निमित्ताने आपल्यातील बंधु भाव जपून धार्मिक एकोपा जोपासला आहे एक चांगला आदर्श समाजापुढे आणावा अशी प्रतिक्रिया कमला देवी मंदिराच्या विश्वस्तांनी व्यक्त केली आहे दरवर्षी प्रत्येक सणाच्या निमित्ताने असे उपक्रम राबविले जावेत अशी आशा व्यक्त केली आहे.यावेळी उपस्थित असलेल्या सर्व मुस्लिम समाजातील व्यक्तीचे स्वागत केले यावेळी समीर शेख,मजहर नालबंद, शोएब बेग, शाहरुख शेख व इतर मुस्लिम समाजातील बांधव उपस्थित होते या कार्यक्रमा चे आयोजक रहेनुमा चॅरिटेबल ट्रस्ट, मुस्लिम विकास परिषद हाजी हाशमोद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्ट, भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा करमाळा मुस्लिम समाज यांनी केले होते.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…