राजुरी प्रतिनिधी
आमदार संजय मामा शिंदे यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यामध्ये सुरू असलेला विकासाचा झंझावात आणि राजुरी येथे मामांच्या माध्यमातून झालेली व होणार असलेली अनेक लोक उपयोगी कामे यामुळे आम्ही संजय मामांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे राजुरी येथील कार्यकर्त्यांनी ठामपणे सांगितले.
काल माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या गटात प्रवेश केलेले राजुरी च्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश जाधव यांचे वडील ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब जाधव ,नामदेव जाधव ,परशुराम जाधव ,कल्याण दुरंदे, नितीन दुरंदे ,संपत दुरंदे यांनी आज राजुरीचे सरपंच डॉक्टर अमोल दुरंदे, नंदकुमार जगताप व नवनाथ दुरंदे यांच्यासह बारामती अग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांची भेट घेतली व आम्ही आमदार संजय मामा शिंदे यांच्याबरोबर आहोत असे सांगितले.
बारामती अग्रो साखर कारखान्याच्या माध्यमातून सुभाष आबा यांचे राजुरी येथील लोकांना फार मोठ्या प्रमाणावर सहकार्य असते. याशिवाय आमदार मामांच्या माध्यमातून राजुरी येथे झालेली मोठ्या प्रमाणावर विकास कामे( *राजुरी ओढ्यावरील दोन पूल* ,*राजुरी ते वाशिंबे हा रस्ता*, *राजुरी चढाचे खोलीकरण*) यासह *राजुरी साठी स्वतंत्र सब स्टेशनची निर्मिती आणि पोंधवडी चारी च्या माध्यमातून राजुरी तलावात सोडण्यात येणारे कुकडीचे पाणी* ही सर्व कामे आमदार मामांच्या माध्यमातून पूर्ण होणार आहेत. व यामुळे राजुरी परिसराचा कायापालट होणार आहे. त्यामुळे आम्ही संजय मामा शिंदे यांना सोडण्याचा प्रश्नच येत नाही. जीवात जीवमान असेपर्यंत आम्ही मामांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असेही त्यांनी सांगितले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…