सामाजिक कार्यासाठी तत्पर असलेले घारगाव येथील सरवदे कुटुंब

घारगाव प्रतिनिधी सामाजिक कार्यासाठी तत्पर असलेले घारगाव येथील सरवदे कुटुंब असुन अनावश्यक खर्च टाळून मुलाच्या वाढदिवसानिमित्त स्व.वेदप्रकाश लच्छीराम गोयल निवासी मतिमंद विद्यालय येथे सरवदे कुटुंबाकडून शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने आपला मुलगा देखील ५०% अस्थिव्यंग आहे. त्याची इच्छा होती की, माझ्याकडून देखील काहीतरी मूकबधिर मतिमंद बांधवांना शैक्षणिक मदत व्हावी. म्हणून वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून मूकबधिर मतिमंद निवासी विद्यालय फुलगाव ता. हवेली जि. पुणे या ठिकाणी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना ( *सचित्र बालमित्र, अक्षर उजळणी, वह्या पुस्तके*) शैक्षणिक साहित्याचे व खाऊचे वाटप केले समाज कार्यामध्ये सरवदे कुटुंब हे समाजकार्यात व शिक्षणाच्या बाबतीत सतत मदत करीत असते‌. त्यामुळे शाळेच्या वतीने सरवदे यांचे आभार व्यक्त करण्यात आले. त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळावी या उद्देशाने वह्या व पुस्तके भेट देत सामाजिक उपक्रम राबवण्यातआला. इतरांनीही असेच अनुकरण करावे व मतिमंद, मूक बधिर, अस्थिव्यंग बांधवांना सहकार्य करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संजय सरवदे यांनी केले.यावेळी सागर कट्यारमल सर मुख्याध्यापक , श्री संजय सरवदे ,सौ.लक्ष्मी सरवदे (ग्रामपंचायत सदस्य घारगाव) व गोपाळ बानोले ,प्रवीण नांगरे, लक्ष्मण नांगरे, प्रज्वल अभ्यंकर शिक्षकवर्ग विद्यार्थी उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago