करमाळा प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील निधी वाटप सह विविध कमिटी सदस्य नियुक्ती करताना शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विश्वासात घेऊनच निर्णय घेऊ असा विश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. सोलापूर येथील हेरिटेज हॉटेलमध्ये शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या शिंदे गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली
या बैठकीसाठी जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे सोलापूर महेश चिवटे करमाळा मनीष काळज सोलापूर चरण चौरे मोहोळ शहर प्रमुख मनोज शेजवान उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय सावंत मोहोळ तालुका प्रमुख बापू भोसले मोहोळचे युवा नेते सोमेश शिरसागर सोलापूरचे हरिभाऊ चौगुले आधीसह शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्ह्यातील महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी पालकमंत्री विखे पाटील यांचा सत्कार करून सोलापूर जिल्ह्यातील समस्या त्यांच्यापुढे मांडल्या प्रत्येक तालुका रखडलेल्या कामाची यादी दिली
बोलताना प्राध्यापक शिवाजीराव सावंत म्हणाले सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा नियोजन मंडळाचा निधी वाटप शिवाय शासकीय कमिटी सदस्यांचे वाटप आधी सर्व ध्येयधोरणासंदर्भात सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख भाजप शिवसेना पदाधिकाऱ्यांची 11 सदस्यांची कमिटी करून त्या माध्यमातून शिवसेना-भाजपचा समन्वय ठेवून जिल्ह्याचे विकासाचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी केली .पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व शिवसेनेच्या शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांना विश्वास घेऊन काम केले जाईल लवकरच या संदर्भात मंत्रालयात एक समन्वय बैठक आयोजित करून सोलापूर जिल्ह्यातील सर्वच प्रश्नांचा आढावा घेऊ असे आश्वासन दिले आहे.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…