करमाळा प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व सोलापूर जिल्ह्यातील सर्वांना समान न्याय देणार म्हणून ओळखले जाणारे आमदार विजय मालक देशमुख यांना काही अतिरेकी प्रवृत्तीच्या लोकांनी जे मारण्याची धमकी दिली आहे याचा करमाळा शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला असून या धमकीच्या पत्राची सखोल चौकशी करावी अशी मागणी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे निवेदनाद्वारे करमाळा शिवसेनेने केली आहे
माझी पालकमंत्री विजय मालक देशमुख यांना जे मारण्याची धमकीचे पत्र मिळाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे आज करमाळा शिवसेनेचे घेण्यात आलेल्या बैठकीत या धमकी पत्राचे जाहीर निषेध करण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे
या बैठकीसाठी सोलापूर शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील तालुकाप्रमुख देवानंद बागल युवा सेनेचे जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे तालुका प्रमुख राहुल कानगुडे शिवसेना शहरप्रमुख संजय आप्पा शीलवंत उपशहर प्रमुख नागेश गुरव राजेंद्र काळे युवा सेना शहरप्रमुख विशाल गायकवाड शिवसेनेचे प्रवक्ते एडवोकेट शिरीष लोणकर हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर कोळगाव शाखाप्रमुख नागेश शेंडगे शिवसेना वैद्यकीय सहाय्यता पक्ष तालुका समन्वयक दीपक पाटणे रोहित वायबसे रंभापुरा शाखाप्रमुख निलेश चव्हाण कुंभेज शाखाप्रमुख मारुती भोसले युवा सेना उपजिल्हाप्रमुख मावळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की पुणे सारख्या सांस्कृतिक शहरात पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्या अवलादी तयार होऊ लागले आहेत अशा प्रवृत्तींना ठेचण्याचे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब घेतला आहे यामुळेच पीपीएफ सारख्या राष्ट्रवादी संघटना सक्रिय झाले आहेत या सक्रिय संघटनेची पाळीमुळे सोलापूर पर्यंत आले असून देशद्रोहाचे काम करणाऱ्या सोलापूरतील व्यक्तींचा शोध पोलिसांनी घेणे गरजेचे आहे निश्चितच पीपीएफ च्या कार्यकर्त्याचा या धमकी पत्रात समावेश असू शकतो असा संशय जीव त्यांनी व्यक्त केला आहे
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…