▶️ नीट मध्ये 500 मार्क्सच्या वरती 35 विद्यार्थी.
▶️ जेईई ॲडव्हान्स व मेन्स मध्ये 20 विद्यार्थ्यांचे IIT व NIT मध्ये सिलेक्शन
▶️ एमएचटी-सीईटी मध्ये 25 विद्यार्थ्यांना 97% च्या वरती मार्क्स.
बारामती प्रतिनिधी
चैतन्याज ॲकडमी व चैतन्याज् इंटरनॅशनल स्कूल मधील नीट,जेईई-ॲडव्हान्स, जेईई-मेन्स तसेच एमएचटी-सीईटी मध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा गुणगौरव सोहळा घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला,
या प्रसंगी सदर कार्यक्रमासाठी सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन करुन करण्यात आली त्यानंतर स्वागतपर प्रास्ताविक देशपांडे सर यांनी केले व त्यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले कि, विद्यार्थ्यांला स्वतः चा सर्वांगीण विकास व प्रगती करायची असेल तर त्याने परिश्रम घेऊन अभ्यास केला पाहिजेत व शिक्षकांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतले पाहिजे,
कार्यक्रमाच्या मध्यांतरात सर्व गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व काहि विद्यार्थी,शिक्षक व पालकांनी आपली मनोगते व्यक्त केली,
सदर कार्यक्रमामध्ये सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या चेह-यावर समाधान व आनंद दिसुन येत होते व त्यांनी आपल्या भाषणातून ते समाधान व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणुन या गुणवंत विद्यार्थ्यांना शिकवणारे व त्यांचे आयुष्य घडवणारे सर्व शिक्षक होते व सर्व शिक्षकांच्या हातुन या गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा गुणगौरव करण्यात आला,
शिक्षकांमध्ये नटवर सर, कल्याण सर,प्रतिक सर, दिपक सर,यांची भाषणे झाली सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या,
कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षिय भाषण श्री.आशिषकुमार खञी सर यांचे झाले त्यांनी आपल्या भाषणातून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व काही जुने अनुभव व्यक्त केले व बारामतीमध्ये नीट मध्ये 700 मार्क्सचा पहिला विद्यार्थी हा चैतन्याज् ॲकडमीचा असेल अशा भावना व्यक्त केल्या. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा.प्रविण अंबोधरे सर यांनी केले.
माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…