केत्तुर प्रतिनिधी
*करमाळा तालुक्यातील केम, जेऊर आणि पारेवाडी रेल्वे स्थानकावर जलद गाड्यांना थांबा देण्याची मागणी बऱ्याच दिवसापासुन आहे. त्यामधे जेऊर आणि केम ला पुर्वीपासुन काही गाड्यांना थांबा आहे परंतु पश्चिम भागातील एकमेव आणि गजबज असणारे पारेवाडी स्टेशनला मात्र पॅसेंजर गाडी शिवाय थांबा नाही.. यासाठी सन-१९९६ साली येथिल नागरिकांनी रेल्वे रोको आंदोलनही केलेले आहे.. या रेल्वे स्टेशन व परिसरात मासे विक्रीचा मोठा व्यवसाय चालतो, तसेच एरीगेटेड एरीया असल्याने भाजीपाला, दुध याचेही उत्पादन होते, या ठिकाणची विद्यार्थी संख्या पुणे, मुंबई आणि सोलापुर ला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या खुप आहे, त्यामुळे निदान ट्रायल बेसिस वर तरी गाडी चालु करून पहावी अशीही येथील ग्रामस्थ व प्रवाशांची मागणी आहे.. माढा लोकसभेचे विद्यमान खासदार रणजितनाइक निंबाळकर यांची पारेवाडी येथिल ग्रामस्थ, व्यापारी, प्रवासी यांनी अनेकवेळा भेट घेतली आहे, परंतु आजपर्यंत खासदारांनी कसलीही दखल घेतलेली नाही.. गेल्या तीन वर्षात खासदारांनी करमाळा तालुक्यात पुर्ण दुर्लक्ष केलेले असुन कोणतीही ठोस कामे केलेली नाहीत.. पहील्या तीन वर्षात त्यांनी फक्त फलटण, माण, खटाव तालुक्यांना निधी दिला आहे मात्र माढा,माळशिरस आणि विशेषतः करमाळ्याला काहीच दिलेले नाही. स्वतः खासदार रेल्वे बोर्डाचे सदस्य असुन आजपर्यंत केम, जेऊर आणि पारेवाडी रेल्वे स्टेशन वर गाड्या थांबविण्या करीता काहीच केलेले नाही. गेल्या आठ दहा दिवसांपुर्वी ही पारेवाडी रेल्वे स्थानकावर जलद गाड्यांना थांबा दयावा अशी प्रत्यक्ष मागणी केली होती, तरीही याची दखल खासदारांनी घेतली नसुन, .पारेवाडी स्टेशन हे देखिल महत्वाचे स्थानक असुन येथील प्रवाशांचे सोईसाठी एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्यावा अशी विनंती केली आहे…. किमान एक तरी एक्सप्रेस ला थांबा द्यावा अन्यथा आगामी काळात आमच्या न्याय हक्कासाठी पुन्हा आंदोलनाची तयारी करू असे सुचक वक्तव्य केत्तुरचे माजी सरपंच ॲड. अजित विघ्ने यांनी केले आहे..*
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…