उमरड – पूर्व सोगाव लोकवर्गणीतून होणाऱ्या रस्त्याला प्रा.रामदास झोळ फाऊंडेशन चा हातभार

उमरड प्रतिनिधी
उमरड -पूर्व सोगाव हा रस्ता मागील अनेक दिवसांपासून नादुरुस्त आहे.रस्त्यावर जाणे-येणे ही सर्व सामान्याला अवघड होवून बसले आहे.कारण रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी, रस्त्याला पडलेले खड्डे,पाईप लाईनच्या चाऱ्या यामुळे लोक त्रस्त झाले आहेत.तेव्हा लोकांनी लोकवर्गणीतून रस्त्याची दुरुस्ती करण्याचे ठरविले आहे.यासाठी आज ,प्रा.रामदास झोळ फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ सर यांनी पूर्व सोगाव या ठिकाणी ग्रामस्थांची भेट घेतली आणि रस्त्यासाठी मदतीचा हात पुढे केला.तसेच ग्रामस्थांबरोबर रस्त्याची समस्या, शिक्षणासाठी होणारी मुलांची हेळसांड, उसाचा प्रश्न, लाईटचा प्रश्न या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली.सोगाव ग्रामस्थांकडून आनंद व्यक्त केला जात आहे कि,प्रा.रामदास झोळ स्वतः गावात आले व त्यांनी या रस्त्याची पाहणी केली आणि हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला.या प्रसंगी पूर्व सोगावचे नेमीनाथ (तात्या) सरडे, रेवणनाथ निकत, ज्ञानेश्वर गोडगे,भाऊ राखुंडे, तानाजी राखुंडे, राहूल गोडगे, ब्रम्हदेव सरडे, अतुल गोडगे,नंदा किशोर सरडे,भागवत मांढरे, सुनील मांढरे,बापु मुळे तसेच उमरड गावचे ग्रामस्थ संदिप मारकड, श्रीकांत मारकड, भाग्यवंत बंडगर आणि गणेश मारकड उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

1 day ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

2 days ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

2 days ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

1 week ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

2 weeks ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

2 weeks ago