Categories: करमाळा

करमाळा शहरासह तालुक्यात खूप मोठा पाऊस झाल्यामुळे शाळेंना सुट्टी दयावी – जगदिश अग्रवाल शहराध्यक्ष भाजप

करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरासह तालुक्यात खूप मोठा पाऊस झाला आहे ओढे नाले गच्च भरले आहे.अनुचित घटना घडु नये म्हणून तालुक्यातील सर्व शाळा बंद ठेवावे असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांनी केले आहे. त्यांनी याबाबत गटशिक्षणाधिकारी पाटील यांना दूरध्वनीवरून विनंती केली आहे. याबाबत लगेचचसर्कुलर काढले जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.                         करमाळा तालुक्यात खूप ठिकाणी वादळी वाऱ्यासह ढगांच्या कडकडाट,वीजांचा आवाज येत होता.गुरसळी येथे पुलावरून एक व्यक्ती वाहून गेला आहे असे समजते, शहरातील रस्तेही गच्च भरून वाहत आहे.उद्याही हवामान खात्याने खूप पाऊस पडेल असे सांगितले आहे यामुळे लहान मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे यासाठी उद्या शाळेला सुट्टी राहील  याबाबतगटविकासअधिकारी,गटशिक्षणाधिकारी,मुख्याधिकारी यांच्याशी बोलणे झाले आहे असे ही अध्यक्ष आग्रवाल यांनी सांगितले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

21 hours ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago