करमाळा प्रतिनिधी.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामध्ये खरीप हंगामात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस पडल्यामुळे व परतीच्या पावसाने हाहाकार केल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे व पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शासनाने तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत जाहीर करावी असे निवेदन आ. संजयमामा शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब यांना दिले आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब यांनाही माहितीसाठी दिली आहे.
सदर निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की, करमाळा माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये दिनांक 6 ऑक्टोबर पासून ते 12 ऑक्टोबर पर्यंत सालसे, केम, अर्जुननगर, जेऊर, कोर्टी, केतुर, उमरड या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून सदर गावामध्ये पंचनामे सुरू आहेत. सदर मंडळामध्ये सरासरीच्या पाचपट अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा, उडीद, तूर, मका, सूर्यफूल, केळी, भाजीपाला इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे.
करमाळा तालुक्यामध्ये जून ते 12 ऑक्टोबर 2022 अखेर सरासरीच्या तुलनेने 170 टक्के पाऊस झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने रब्बी हंगाम लांबणीवर पडणार असून ज्वारी ,हरभरा, कांदा या पिकांच्या लागवडी कमी होण्याची शक्यता आहे.
तरी करमाळा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ मदत देण्यात यावी असे पत्र आमदार शिंदे यांनी दिले आहे.निवेदनाच्या
प्रती ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब, विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार साहेब यांनाही दिलेल्या आहेत.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…