करमाळा प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात गेली दोन दिवसात अचानक झालेला ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या कांदा केळी फळबागा सोयाबीन उडीद तुर पिकाचे मोठे नुकसान झाले असून त्याचे तात्काळ पंचनामे करून तात्काळ नुकसानीचे आकडे मागून घ्या असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मुंबई येथे नंदनवन बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील जिल्हाप्रमुखांची बैठक झाली या बैठकीत जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे महेश चिवटे चरण चवरे मनीष काळजे उपस्थित होते
त्यावेळी सोलापूर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या मोबाईल क्लिप थेट प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी मुख्यमंत्री यांना दाखवल्या यावेळी तात्काळ मुख्यमंत्री यांनी प्रशासनाला सोलापूर जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले
यावेळी करमाळ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी मंजूर केलेली 45 लाख तसेच प्रशासकीय इमारत दोन कोटी व टाऊन हॉल साठी तीन कोटी रुपये या निधीला स्थगिती दिली असून ही स्थगिती उठवावी असे निवेदन महेश चिवटे यांनी दिले.
सोलापूर जिल्ह्यासाठी स्वतंत्र शिवसेना मंत्र्याकडे जबाबदारी द्यावी अशी मागणी अमोल बापू भोसले यांनी केली तसेच नियोजन मंडळ व इतर समित्यावर बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नेमणूक देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी मनीष काळजे यांनी केली
सोलापूर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची मोबाईलवर केलेली चित्रफीत प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना दाखवल्यानंतर त्यांनी ती शांतपणे दोन मिनिटे पाहिली व तात्काळ प्रशासकीय अधिकाऱ्यांना समक्ष फोन करून सोलापूर जिल्ह्यातील पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.
मोहोळ तालुक्यातील रखडलेली विकास कामासाठी निधी देण्याची मागणी चरण चौरे यांनी केली.या बैठकीनंतर बोलताना प्राध्यापक शिवाजीराव सावंत म्हणाले की पुढील आठवड्यात पुन्हा आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील प्रश्नांची यादी त्यांच्यापुढे मांडणार असून येणाऱ्या काळात जास्तीत जास्त विकासाची कामे सोलापूर जिल्ह्यात करून घेऊ असा विश्वास प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी व्यक्त केला आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…