करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरामध्ये लंम्पी आजाराच्या प्रादुर्भावामुळे.सुतार गल्ली येथे एक मोकाट गाय फिरत होती तिला लॅम्पिचा आजार असल्याची लक्षणे असल्यामुळे त्या गाईवर उपचार करण्यासाठी बऱ्याच जणांनी बातम्या देऊन प्रशासनाकडे तक्रार केली पण त्या गाईवर उपचार करण्यासाठी कोणीही पुढे न आल्यामुळे गाईचे अतोनात हाल होत होते ही परिस्थिती दत्तपेठ तरुण मंडळातील कार्यकर्त्यांना बघतल्यानंतर त्यांनी तात्काळ त्या गाईवर उपचार करण्याचे ठरवले व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क करून डॉक्टर विजय जाधव यांना बोलावून घेऊन गाईला लस देऊन इंजेक्शन व सलाईन देऊन गाईचे प्राण वाचवण्याचे पुण्याचे काम केले आहे. या पुण्यकर्मामध्ये सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर यांनी पुढाकार घेतला असून दत्त मंडळाचे कार्यकर्ते चरणसिंग परदेशी अमोल परदेशी अरुण टांगडे योगेश सोरटे .वर्धमान खाटेर सचिनशेठ साखरे, धनंजय महाजन, अमोल परदेशी, नानासाहेब मोरे, अरुण टांगडे, राम टांगडे, विश्वजित परदेशी, सचिन भणगे, संग्राम देशमूख या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन गाईला जीवनदान देण्याचे महान कार्य केले आहे.करमाळा शहरात कुठल्याही गाईला लंपी आजार सदृश्य लक्षणे जाणवल्यास गाईच्या उपचारासाठी दत्तपेठ तरूण मंडळ तिची काळजी घेण्यासाठी मंडळ कटिबद्ध असून आमच्या मंडळाची संपर्क साधण्याचे आवाहन श्रेणिकशेठ खाटेर चरणसिंग परदेशी यांनी केले आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…