करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जेऊर येथे मंगळवारी (ता. 18) ‘आमदार आपल्या दारी, शासकीय योजना पोहचतील घरोघरी’ हा उपक्रम होणार आहे. नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट गावातच लाभ मिळावा म्हणून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. आमदार संजयमामा शिंदे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम होणार आहे. याचा लाभ जेऊरसह दहिगाव, शेलगाव, लव्हे, निंभोरे, शेटफळ, जेऊरवाडी येथील नागरिकांनी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमात नागरिकांना नवीन रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना आणि नवीन मतदार नोंदणी, उज्वला गॅस योजना, एसटी बस पास, मोतीबिंदू तपासणी व उपचार, आधार कार्ड नोंदणी, ई- श्रम नोंदणी, दिव्यांग नोंदणी, असंघटित कामगारांची नोंदणी अशा विविध शासकीय योजनांच्या पात्रतेचे निकष सांगण्यात येणार आहेत.याबरोबर पात्र व गरजु नागरिकांचे अर्ज कार्यक्रमस्थळी स्वीकारण्यात येवून त्यांची विविध योजनांसाठी निकषाप्रमाणे निवड करण्यात येणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी सर्व कागदपत्रे घेऊन शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जेऊर येथील स्वामी विवेकानंद पतसंसंस्थेचा हॉल येथे हा कार्यक्रम होणार आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…