महापुरुषांच्या जीवनाचा आदर्श समाजाने आत्मसात करण्याची गरज : मौ. मोहसीन शेख

 

करमाळा  प्रतिनिधी

विश्वभूषण महामानव हजरत मुहम्मद पैगंबर साहेब आणि भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून हजरत मुहम्मद पैगंबर साहेब यांच्या जीवन चरित्रावर आधारित लेखक नाथू राम लिखित मुहमद पैगंबर(स.) जीवन आदर्श या पुस्तक वाटपाच्या आयोजित कार्यक्रमा प्रसंगी जमियत उलेमा ए हिंदचे सदर मौ. मोहसीन शेख बोलत होते.

या कार्यक्रमाला करमाळा जेलर समीर पटेल, माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, दीपक ओहोळ, नगरसेवक संजय सावंत, छत्रपती क्रांती सेनेचे संयोजक आर. आर. पाटील, पत्रकार सचिन जव्हेरी, अलीम शेख, अश्पाक सय्यद, बबन आरने आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मौलाना शेख म्हणाले कि, कोणताही धर्म इतर धर्माचा द्वेष करीत नाही, मानवतेची विचारधारा सर्वच महापुरुषांनी समाजाला दिली आहे. हीच महापुरुषांची मानवतेची विचारधारा समाजाने आत्मसात करण्याची गरज असल्याचे मत मौलानांनी माडले.

यावेळी हाजी सादिक काझी, बामसेफचे अरुण माने, दलित सेनेचे लक्ष्मन भोसले, शब्बीर शेख, बहुजन क्रांती मोर्चाचे दिनेश दळवी, राजेंद्र फुलारी, बुधिस्त इंटरनॅशनल नेटवर्कचे गौतम खरात, दीपक भोसले, मौलाना कादिर शेख, मौलाना मारगबुल हसन, जिगर ग्रुपचे अमर शेख, भटके विमुक्त मोर्चाचे दिनेश माने यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाला उपस्थित सर्वांना पुस्तकाचे वाटप करण्यात आले.यावेळी कार्यक्रमची प्रास्ताविक राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे अध्यक्ष कय्युम शेख यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार बहुजन विकास परिषदेचे अध्यक्ष इसाक पठाण यांनी केले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

15 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

18 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

20 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago