चंदुकाकानी सर्वसामान्य जनतेसाठी केलेले कार्य प्रेरणादायी असुन त्यांच्या वाटचालीस आपला सदैव पाठींबा- आमदार संजयमामा शिंदे

करमाळा प्रतिनिधी चंदुकाकानी सर्वसामान्य जनतेसाठी केलेले कार्य प्रेरणादायी असून जनसामान्याचे नेते असलेले चंदूकाका यांच्या कार्यास आपला सदैव पाठिंबा असल्याचे करमाळा तालुक्याचे विकास प्रिय आमदार संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केले.
चिखलठाणचे सरपंच चंद्रकांत काका सरडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सत्कार प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन माजी आमदार जयवंतराव जगताप उपस्थित होते .याप्रसंगी बोलताना जयवंतराव जगताप यांनी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुक शिंदे गट जगताप गट युतीच्यावतीने लढवण्यात येणार असल्याचे जाहिर केले आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीमध्ये आदिनाथ कारखान्याचे मा. संचालक तानाजी बापू झोळ आदिनाथ कारखान्याचे मा.चेअरमन वामनदादा बदे मा.जि.प. सदस्य उध्दवदादा माळी, दादासाहेब लबडे,भोजराज सुरवसे,महादेव कामटे सामाजिक कार्यकर्त श्रेणिक खाटेर गणेश करे पाटील उमेश बोराडे आदी मान्यवराच्या उपस्थितीमध्ये आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते चंद्रकांत काका सरडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संजयमामा म्हणाले की एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेऊन आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर चंदूकाका सरडे यांनी ग्रामपंचायत सदस्य ते जिल्हा परिषद सदस्य आदिनाथ कारखाना व्हाईस चेअरमन यासारखी पदे त्यांनी भूषवले असून सध्या जनतेचे सरपंच म्हणून ते काम करीत आहे. आपल्या कार्याच्या जोरावर अखंड जनसमुदायाचा पाठिंबा मिळवुन कार्यकर्ते टिकून विकासाचा रथ चालवणे एवढे सोपे नाही. त्यासाठी जनसामान्यांची सेवा करण्याचा पिंड असावा लागतो. काकांनी साखर कारखानदारी ऊस तोडणी वाहतुकीच्या माध्यमातुन अनेकांना रोजगार मिळवुन दिला असुन जनसामान्याचा नेता म्हणुन त्यांची राजकारणात ओळख निर्माण झाली आहे. चंद्रकांत काका सरडे यांना समाज कल्याणची तळमळ असुन समाज कल्याण करण्याचे काम केल्यामुळे राजकारणात यशस्वी झाले असुन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. चंद्रकांत काका सरडे यांच्या वाढदिवसानिमित्त सपुंर्ण दिवस कार्यक्रमाचे विविध कार्यक्रमाचे आयोजन चंद्रकात सरडे युवा मंचच्यावतीने करण्यात आले होते.यामध्ये आदर्श सरपंच भास्करराव पेरे यांचे व्याख्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात 101 जणांनी रक्तदान केले असुन सोलापुर येथील सिद्धेश्वर ब्लड बँक यांच्या सहकार्याने शिबिर संप्पन झाले.या रक्तदान शिबिराचे उद्घघाटन ह भ प दुर्गाप्रसाद तिडके महाराज गणेश करे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दिवसभरामध्ये चंदुकाकांना शुभेच्छा देण्यासाठी देवानंद बागल ,नानासाहेब लोकरे ,कणूभाई देवी, धनंजय डोंगरे, धुळाभाऊ कोकरे अजित तळेकर डॉक्टर गोरख गुळवे सुनील सावंत, गणेश करे पाटील, राजेंद्रसिंह राजे भोसले यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सत्कार केला. चिखलठाण ग्रामस्थ तसेेच  पंचक्रोशीती  नागरिकांच्यावतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला.जनतेचे सरपंच तालुक्याचे लोकनेते चंद्रकांत सरडे यांचा वाढदिवस मोठया उत्साहात संप्पन झाला.या कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

1 day ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

1 day ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

1 day ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

2 days ago

करमाळा एमआयडीसी मधील भूखंड वाटपास सुरुवात उद्योजकांनी लाभ घ्यावा जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…

5 days ago