करमाळा प्रतिनिधी श्री .आदिनाथ सह . साखर कारखान्याच्या संचालक मंडळ, बचाव समिती व कारखाना सुरु करणेसाठी पुढाकार घेतलेल्या नेत्यांनी स्वतःचा व आपल्या कुटुंबियांचा संपूर्ण ऊस फक्त आदिनाथ लाच घालावा , ऊसाचे एक टिपरू देखील दुसऱ्या कारखान्याला घालू नये तशा प्रकारे या सर्वांनी श्री .आदिनाथ व कोटलिंग चरणी शपथच घ्यावी असे आवाहन आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन तथा माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी चिखलठाण येथे जाहीर सभेत बोलताना केले .श्री . जगताप आदिनाथ चे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत सरडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत कार्यक्रमात बोलत होते . यावेळी आमदार संजयमामा शिंदे, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील उपस्थित होते .सध्याच्या स्थितीत आदिनाथ सुरु करण्याच्या हालचाली , सातत्याने १५ वर्षे सत्ता असूनही गैरकामकाजामुळे, गैरव्यवस्थापन व भ्रष्टाचारामुळे सलग ३ वर्षे बंद असलेला कारखाना यामुळे सत्ताधार्यांनी सभासदांचा गमाविलेला विश्वास, त्यांचे मनात असलेला प्रचंड रोष व येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार जगताप यांचे विधान अत्यंत महत्वपुर्ण आहे . यावेळी माजी आ. जगताप यांनी घोडे मैदान जवळच आहे याची आठवण करून देत एकप्रकारे निवडणुकीचे रणशिंग फुंकत जनतेला योग्य नेत्यांची प्रतवारी करण्याचे खुले आवाहन केले . येणाऱ्या सर्व निवडणुका आपण व आ .संजयमामा शिंदे एकत्रच लढविणार असून योग्य उमेदवार देणार असल्याचे देखील जगताप यांनी सांगितले . या प्रसंगी आदिनाथचे माजी अध्यक्ष वामनराव बदे, उद्धवदादा माळी, तानाजी झोळ, महादेव कामटे, दादासाहेब लबडे, श्रेणिक खाटेर , सुजित बागल यांचेसह चिखलठाण व पंचक्रोशीतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…