केत्तूर (अभय माने ) : यंदा शंभर टक्के ऊस गाळपाचे आमचे उदिष्ट आहे. शेतकऱ्यांनी साथ दिल्यास संपूर्ण ऊस गाळपाची जबाबदारी आमची राहील असे प्रतिपादन अंबालिका शुगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश तावरे यांनी शुक्रवारी केले. ते 12 व्या गळीत हंगामाच्या प्रारंभ करताना बोलत होते.
कर्जत तालुक्याची कामधेनू असलेल्या अंबालिका शुगरच्या गळीत हंगामाचा प्रारंभ शुक्रवारी (ता. 14) संचालक विश्वजित भोसले, मुख्य संचालन अधिकारी जंगल वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश तावरे, जनरल मॅनेजर सुरेश शिंदे, मुख्य शेतकी अधिकारी विठ्ठल भोसले, श्याम कानगुडे, माधुरी पाटील, अण्णासाहेब मोरे, नवनाथ झोळ, संजय सुद्रिक, विजय मोढळे, अच्युतराव लोंढे, अॅड. बाळासाहेब शिंदे, नितीन धांडे, संजय तोरडमल, सुहास गलांडे, सागर लोंढे यांच्यासह कर्जत, करमाळा, श्रीगोंदा, इंदापूर, शिरूर या तालुक्यातील ऊस उत्पादक, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाला.
तावरे म्हणाले, अंबालिकाने सर्व भागातील ऊस आणण्याचे विभागवार नियोजन केले आहे. त्यात प्राधान्याने कर्जतचा ऊस आणला जाईल. मागील गळीत हंगामात 19लाख 51 हजार मे. टन ऊसाचे गळीत करून एफआरपीची संपूर्ण रक्कम कारखान्याने प्रति मे.टन रू.2801 प्रमाणे ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग केली आहे. शेतकऱ्यांनी उसाची लागण केल्याबरोबर नोंद करावी, यंदा उसाचा दर शेतकऱ्यांच्या हातात आहे. जितका ऊस दर्जेदार द्याल त्याच्या रिकव्हरीनुसार दर मिळेल. अंबालिकाच्या कामगारांना वेतन मंडळ लागू करतोय. तसेच इथेनॉल व वीजनिर्मिती वाढवतोय.
जनरल मॅनेजर सुरेश शिंदे म्हणाले, उसाची नोंद करणे गाळपासाठी महत्वाचे आहे. कोणाचाही ऊस शिल्लक ठेवणार नाही. शेतकऱ्यांनी बेणं चांगले वापरावे.
पंचायत समितीचे माजी सदस्य अण्णासाहेब मोरे यांनी यंदा तीन हजारांचा दर जाहीर करावा अशी मागणी करीत कामगारांना वेतनवाढ दिल्याबद्दल अंबालिकाचे अभिनंदन करून, नगर जिल्ह्यात उत्कृष्ट दर देणार कारखाना म्हणून कौतुक केले. यावेळी नवनाथ झोळ,विजय मोढळे, संजय सुद्रिक, सागर लोंढे,संजय तोरडमल यांची भाषणे झाली. तानाजी झोळ, नागेश लकडे धुळाभाऊ कोकरे,ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतुक कंत्राटदार उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रदीप जांभळे यांनी केले. आभार सुरेश शिंदे यांनी मानले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…