आमदार आपल्या दारी शासकीय योजना पोहचतील घरोघरी..!” जेऊर मध्ये संपन्न


जेऊर प्रतिनिधी.
विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना थेट त्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम करमाळा विधानसभा मतदारसंघात आमदार संजयमामा शिंदे यांच्या सूचनेनुसार राबविण्यात येत आहे. आत्तापर्यंत रावगाव, जातेगाव, चिखलठाण, कंदर, केतुर, कोर्टी ,साडे, वांगी नं.3 या ठिकाणी राबवलेल्या उपक्रमांमधून जवळपास 14 हजार नागरिकांना या उपक्रमाचा लाभ झाला. त्यामुळेच जेऊर या ठिकाणी ग्रामस्थांच्या मागणीनुसार दिनांक 18 ऑक्टोबर 2022 आज रोजी आमदार आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जेऊर येथील शिबिरांमध्ये नागरिकांना नवीन रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्‍ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना आणि नवीन मतदार नोंदणी, उज्वला गॅस योजना, एस.टी. बस पास, मोतीबिंदू तपासणी व उपचार, आधार कार्ड नोंदणी, ई श्रम नोंदणी, दिव्यांग नोंदणी, असंघटित कामगारांची नोंदणी अशा विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसेच प्रातिनिधिक स्वरूपात काही प्रमाणपत्रांचे वाटपही शिबीर स्थळी करण्यात आले .
या शिबिराचा लाभ दहिगाव, शेलगाव भा, लव्हे, निंभोरे, शेटफळ ,जेऊरवाडी, जेऊर या गावांना झाला.
आमदार आपल्या दारी या उपक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, नायब तहसीलदार सुभाष बदे, मंडळ कृषी अधिकारी बनसोडे साहेब, अव्वल कारकून बाबासाहेब गायकवाड साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले .यावेळी डॉ. रत्नदीप टोपे,पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता वाघमारे , मंडळ अधिकारी काझी, सर्कल वळेकर, पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रहास बापू निमगिरे,माजी पंचायत समिती सदस्य विलास दादा पाटील, अभय शेठ लुंकड, माजी सरपंच अनिल पाटील सर,करमाळा तालुका राष्ट्रवादी पदवीधर चे अध्यक्ष रवींद्र वळेकर, पै. आप्पा मंजुळे, महादेव आरने ,विक्रांत गांधी, हेमंत शिंदे, निकील मोरे, बाळासाहेब करचे ,राकेश पाटील, अतुल निर्मळ, सागर लोंढे ,पांडुरंग घाडगे, आजिनाथ माने, अजित उपाध्ये ,सुहास शिंदे,अभिजीत मह्मणे, पप्पू कांडेकर हे उपस्थित होते.यावेळी जेऊर येथील प्रगती नानासाहेब देशमुख 100 मीटर धावणे,सिद्धार्थ संतोष मंजुळे 200 मीटर धावणे ,प्रीतल विक्रांत गांधी लांब उडी या विद्यार्थ्यांनी युथ गेम्स फेडरेशन इंडिया यांच्या वतीने दिल्ली येथे आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उमेश पाथरूडकर, बालाजी गावडे ,नितीन खटके, दिनेश घाडगे, सुहास तावरे, राजेश ननवरे, बाळासाहेब गरड ,मनोज माने ,महेश कांडेकर, गणेश निमगिरे , धनेश निमगिरे,राजू घाडगे , रणजीत कांबळे ,रमेश लगस, अरुण निर्मळ, समीर केसकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आ. संजयमामा शिंदे यांचे स्वीय सहाय्यक डॉ. विकास वीर यांनी केले तर आभार नितीन खटके यांनी मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

10 hours ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

11 hours ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

2 days ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

3 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

4 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

4 days ago