Categories: करमाळा

रणातही जिंकून वर्तमानाची सोनेरी पाने लिहू शकतात हा इतिहास आहे – यशकल्याणी संस्थापक अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील

करमाळा प्रतिनिधी
आत्मसन्मानाला धक्का लागला तर त्याची प्रतिक्रिया म्हणून माणसाने केलेली वाटचाल त्याला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवू शकते. गाव खेड्यातील उपेक्षित वस्तीत राहून स्वत्व जपणारी माणसं जर मनातून हारली नाहीत तर ती रणातही जिंकून वर्तमानाची सोनेरी पाने लिहू शकतात हा इतिहास आहे. असे प्रतिपादन यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.गणेश-पाटील यांनी जेऊर येथे बोलताना केले.
जेऊर ता.करमाळा येथील भारत महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कर्मयोगी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना “स्वतःकडे वळून पाहताना” या विषयावर प्रा.गणेश- करे पाटील बोलत होते.यावेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे विशेष कार्यकारी अधिकारी हरिदास डांगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
आपल्या जीवनप्रवासातील थोरामोठ्यांच्या सहवासातील अनेक घटना प्रसंगांना उजाळा देऊन करे-पाटील म्हणाले की, नवा इतिहास घडविण्याची उर्मी इथल्या मातीमध्ये आणि माणसांच्या नसानसामध्ये आहे म्हणून
भविष्याचा वेध घेत वाटचाल करा. मैत्रीभाव जपा आणि मनात कधीही हरू नका.
आपल्या अध्यक्षीय भाषणात हरिदास डांगे यांनी स्वतःच्या जडणघडणीतील अभावग्रस्त परिस्थिती व कष्टप्रद जीवनाचा पट श्रोत्यांसमोर उलगडून उपस्थितांना उद्योग व्यावसायामध्ये उतरण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनंत शिंगाडे यांनी प्रा.गणेश – पाटील व हरिदास डांगे यांचा यथोचित सन्मान केला.कर्मयोगी व्याख्यानमालेचे प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी परिवर्तनाच्या वाटचालीमध्ये कर्मयोगी व्याख्यानमालेची भूमीका विशद करून पाहुण्यांचा परिचय करून दिला.तर राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय कार्यक्रम अधिकारी प्रा.अनिल मुंगुस्कर यांनी उपस्थित त्यांचे आभार मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

3 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago