शेतकऱ्यांच्या पिंकाचे अतोनात नुकसान तात्काळ पंचनामे करुन मदत करण्याची काॅग्रेस तालुकाध्यक्ष प्रताप जगताप यांची मागणी

करमाळा प्रतिनिधी शेतकरी हा आपला अन्नदाता आहे.शेतकरी जगला तरच देश जगेल.परंतु परतीच्या पावसाने राज्यातील शेती व शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे.परंतु परतीच्या पावसाने संपुर्ण राज्यभरात मोठ्याप्रमाणात थैमान घातले आहे.यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत.असे असताना देखील राज्यातील दळभद्री “ईडी”सरकार साधे पंचनामेही करायला तयार नाही.खरे तर अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी तात्काळ मदतीची गरज आहे.मात्र राज्यसरकार केवळ टि.व्ही वर दिसत आहे.या गंभीर बाबीकडे शासनाने लक्ष घालुन व राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन दिवाळीपुर्वी शेतकऱ्यांना भरीव मदत करावी असे लेखी निवेदन आज करमाळा तालुका काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली मा.तहशिलदार यांना देण्यात आले.
या निवेदनात शेतकरी हिताच्या दृष्टीने अनेक मागण्या करण्यात आल्या असुन यामध्ये प्रामुख्याने १)संपुर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.
२)हेक्टरी ७५०००/-रुपये मदत मिळावी.
३)मजुरांसाठी विशेष अनुदान जाहीर करावे.
४)मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे जागतिक भुक निर्देशांकात भारताची घसरण झाली असुन जगात १२१ देशापैकी १०४ व्या क्रमांकावर आपला देश आला आहे.हे अतिशय खेदजनक आहे.भारताची ही प्रतिमा सुधारण्यासाठी शेतकरी हिताचे व्यापक धोरण केंद्र सरकार कडुन आखण्यात यावे.
या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.यावेळी ओ.बी.सी.विभागाचे तालुकाध्यक्ष गफुरभाई शेख,सचिव जैनुदीन शेख,अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष दस्तगीर पठाण,गोपिनाथ नाळे, दादा कुदळे,सुजय जगताप,योगेश राखुंडे,उत्तरेश्वर सावंत, गणेश फलफले,गितेशलोकरे,नितीन चोपडे,सुरज जाधव, आनंद झोळ, आदी उपस्थित होते.यावेळी मा.तहसीलदारसाहेबांनी हे निवेदन स्विकारुन आपण तुमच्या सर्वांच्या भावना शासनाकडे त्वरीत कळवु असे आश्वासीत केले.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago