करमाळा /प्रतिनिधी
दिवाळीनिमित्त ‘यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे प्रा. गणेश करे-पाटील यांच्या वतीने “दिवाळी संगीतमय पहाट”चे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी पहाटे 5:30 वाजता यशकल्याणी सेवाभवनच्या भव्य प्रांगणात हा कार्यक्रम सादर होणार आहे.
यावेळी पुणे येथील प्रसिद्ध पार्श्र्वगायक प्रवीण कुमार हे “स्वर तेजोमय पहाट” प्रस्तुत करणार आहेत. या स्वर समूहातील प्रवीण कुमार यांच्यासह राजू जाधव, मंजुषा देशपांडे, सईद बाबा खान, सोमनाथ फाटके, पंडित गोविंद कुडाळकर आणि भालचंद्र हे श्रोत्यांना संगीतमय मेजवानी सादर करणार आहेत.
प्रसिद्ध टीव्ही अँकर आणि निवेदिका रत्ना दहिवलेकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.
तसेच यानिमित्ताने शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कृषी,कला क्रिडा आदि विविध क्षेत्रातील मान्यवरांना यशकल्याणी करमाळा समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
तरी सर्व रसिक श्रोत्यांनी बुधवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी पहाटे ५:३० वाजता या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थचे अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील यांनी केले आहे.
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…
* करमाळा प्रतिनिधी “भारतीय डाक विभागाच्या विविध बचत, विमा आणि आर्थिक सुरक्षा योजना ग्रामीण भागातील…
करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…
करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…