करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील 33 हजार 674 शिधापत्रिका धारकांना आज रात्रीपर्यंत चारही वस्तू असलेले महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आलेले आनंदाचा शिधा कीट येणार असून आज रविवार असताना सुद्धा तालुक्यातील सर्व 158 रेशन दुकान खुले ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हाप्रमुख चिवटे यांनी दिली आहे
आनंदाचा शिधा ही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची फसवी घोषणा आहे अशी टिका विरोधकांकडून होत आहे
याला छेद देण्यासाठी आज बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या lकार्यकर्त्यांनी तालुक्यातील प्रत्येक रेशन दुकान रविवार असताना सुद्धा उघडी ठेवून प्रत्येकाला आनंदाचा शिधा पाकीट पोच करण्याचे काम केले आहे
करमाळा विभागातील 89 दुकानातून 21 हजार 945 व जेऊर विभागातील 40 दुकानातून ११७२९ एकूण 33674 शिधापत्रिकाधारकांना वाटप आज सायंकाळपर्यंत होणार आहे
/////////
प्राध्यापक शिवाजीराव सावंत
सोलापूर जिल्हा बाळासाहेबांची शिवसेना संपर्कप्रमुख
सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आलेला आनंदाचा शिधा सर्व गोडाऊन मध्ये पोहोचलेला असताना सुद्धा लाभार्थ्यांना त्यांना शिधा मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या
यामुळे आज रविवार असताना सुद्धा सर्व रेशन दुकानदारांना विनंती करून सर्व दुकाने उघडे ठेवण्याचे आवाहन केले याला प्रतिसाद देत आज सर्व रेशन दुकानदारांनी सर्व लाभार्थ्यांना घरपोच ऑफलाइन ने मालपुरवठा केला आहे प्रत्येक लाभार्थ्याला शिधा मिळाला का नाही याची तपासणी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा प्रत्येक शिवसैनिक जिल्ह्यात करीत असून कोणाला शिधा न मिळण्यास त्यांनी शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधावा असे आव्हान सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी केली आहे.
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…