करमाळा नगर परिषदेला वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मिळालेल्या १० कोटी निधी वितरित करण्यावरील स्थगिती उठविली -आमदार संजयमामा शिंदे

करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागांतर्गत करमाळा नगर परिषदेसाठी 2021- 22 या वर्षासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत 19 एप्रिल 202 2 रोजी च्या शासन अध्यादेशानुसार १० कोटी निधी मंजुर झालेला होता . परंतु सदर निर्णयाला नगर विकास विभागाने 6 जुलै 2022 रोजी स्थगिती दिलेली होती. सदर स्थगिती दिनांक 25 ऑक्टोबर 2022 च्या शासन निर्णयानुसार उठविली असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार साहेब यांच्याकडे आपण मार्च 2022 मध्ये करमाळा नगर परिषदेमध्ये विविध विकास कामांना राज्यस्तरीय ठोक निधी तरतुदी अंतर्गत १० कोटी रुपयांची निधीची मागणी केली होती. सदर निधीमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा परिसराचे सुशोभीकरण करणे व चबुतरा बांधकाम करणे यासाठी 45 लाख, करमाळा महानगरपालिका प्रशासकीय इमारत बांधकाम करणे यासाठी 4 कोटी 55 लाख तसेच करमाळा महानगरपालिका क्षेत्रात सांस्कृतिक भवन बांधकाम करणे यासाठी 5 कोटी असा एकूण 10 कोटी निधी मंजूर झालेला होता.
ही स्थगिती उठवण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख ( शिंदे गट ) श्री महेश चिवटे यांनीही प्रयत्न केल्याचा आवर्जून उल्लेख आ. शिंदे यांनी केला. या कामामुळे शहराच्या वैभवात निश्चितच भर पडेल असा दावा ही आ. संजयमामा शिंदे यांनी केला. भविष्यकाळातही शहरांतर्गत रस्ते व बंदिस्त गटारी यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असून तसे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

2 hours ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

2 hours ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

8 hours ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

1 day ago

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; शासनस्तरावरील नियम-अटी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…

1 day ago