करमाळा प्रतिनिधी तपश्री प्रतिष्ठान, गोसेवा समिती, दत्त पेठ तरुण मंडळ व बुद्रानी हॉस्पिटल, कोरेगाव पार्क पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने* आज दिनांक 27-10-2022 वार – गुरुवार रोजी मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीर घेण्यात आले. या शिबिरासाठी पुण्यातून बुद्रानी हॉस्पिटल चे डॉ.गिरीश पाटील व त्यांची टीम यांनी आलेल्या रुग्णांची तपासणी केली. यावेळेस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली.*या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून अर्बनं बँकेचे संचालक रामदास जाधव,* तसेच जैन श्रावक संघांचे अध्यक्ष चंद्रकांत जी कटारिया, गोसेवा समितीचे कचरूकाका मंडलेचा यांचे सह सामाजिक कार्यकर्ते श्रेणीक खाटेर उपस्थित होते.यावेळेस बोलताना श्रेणिक खाटेर यांनी मागे आतापर्यंत अनेक रुग्णाचे यशस्वी ऑपरेशन झाले असून भविष्यात ही करमाळा शहर व परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे अहवाहन केले. प्रत्येक महिन्याच्या 27 तारखेला बायपास चौक,देवीचा रोड येथे हे शिबीर होणार आहे असे सांगितले.या प्रसंगी बोलताना अर्बन बँकेचे संचालक रामदास जाधव यांनी शुभेच्छा देऊन भविष्यात खाटेर यांच्या सामाजिक कार्यास कायम सहकार्य राहील अशी ग्वाही दिली.विजयसिंह परदेशीं यांनी पुणे येथील दवाखान्यात खूप चांगल्या सोई असून, स्वछता आहे.ऑपेरेशन खूप छान होतात असे मनोगत व्यक्त केले.तसेच दत्त पेठ तरुण मंडळाच्या वतीने अरुण टांगडे यांनी खाटेर यांच्या कार्याचे कौतुक करून दत्त पेठ तरुण मंडळाचे त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यात कायम सहकार्य राहील असे आश्वासन दिले.आजच्या शिबिरात 90 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 28 रुग्ण बुद्रानी हॉस्पिटल पुणे येथे ऑपेरेशन साठी रवाना झाले. यावेळी देविदास नस्ते यांनी आजच्या व येथून पुढील प्रत्येक शिबिरात रुग्ण व उपस्थितासाठी चहा पाण्याची व्यवस्था करणार असल्याचे जाहीर करून आज च याची सुरवात केली..या शिबिरासाठी जगदीश जी शिगची, भाजपा चे विठ्ठल राव भनगे, अर्जुन इंदुरे, मुन्ना काझी, नारायण तात्या पवार, दिनेश भांडवलकर,योगेश मुथा,पोपटराव काळदाते, रमेश घाडगे, वैभव दोशी, सचिन गांधी,रसिक जी मुथा,विश्वास काळे, वृंदा कुलकर्णी, दिनेश मुथा, केतन संचेती, गणेश बोरा,अनंत मसलेकर, गिरीश शहा, विजय बरीदे,अमोल काळदाते, प्रवीण गंधे, अभय शिंगावी, प्रीतम राठोड,यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमच्या शेवटी वर्धमान खाटेर यांनी सर्वांचे आभार मानले..
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…