लम्पीबाबत आ.संजयमामा शिंदे यांनी घेतली आढावा बैठक…पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले निवेदन

करमाळा प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यांमध्ये सध्या लम्पी या जनावराच्या साथीच्या आजाराने थैमान घातलेले आहे. यासंदर्भात आ. संजयमामा शिंदे यांनी आज करमाळा येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीला पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रवीण शिंदे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तथा सनियंत्रण अधिकारी लम्पी चर्मरोग डॉ. एस. एस. भिंगारे हे उपस्थित होते .
सध्या 64036 पशुधन करमाळा तालुक्यात असून यापैकी 1401 जनावरांना लम्पी ची बाधा झालेली असून यापैकी 574 जनावरे उपचार घेऊन बरी झालेली आहेत. सद्यस्थितीत 827 जनावरावरती उपचार सुरू आहेत.तर 74 जनावरांचा मृत्यू या लम्पीने झालेला असून 56100 जनावरांना लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती यावेळेस डॉ. शिंदे यांनी दिली.
यानंतर पशुसंवर्धन विभागाला येणाऱ्या अडचणी संदर्भात आमदार संजयमामा शिंदे यांनी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिले असून त्यामध्ये असे म्हटले आहे की ,करमाळा विधानसभा मतदारसंघात सध्या लम्पी आजाराने थैमान घातले आहे. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी विलगीकरण केंद्राची आवश्यकता आहे .प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाऊन पशुवैद्यकीय सेवा देण्यास डॉक्टरांना विलंब होत आहे त्यामुळे जनावरांसाठी विलगीकरण केंद्र तयार करण्यात यावे .तसेच जनावरांसाठी दर्जेदार औषधे उपलब्ध करून देण्यात यावी .औषधासाठीचा निधी वाढवून द्यावा व त्याचा पुरवठा वेळेवर व्हावा .
जनावरे मयत झाल्यानंतर त्यांचा पंचनामा करण्यासाठी गावपातळीवरील तलाठी आणि ग्रामसेवक यांचे सहकार्य मिळण्यासाठी आपले स्तरावरून संबंधितांना योग्य ते आदेश व्हावेत असे निवेदन दिले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

1 day ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

1 day ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

1 day ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

2 days ago