करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील डाॅ. रविकिरण पवार यांनी कोरोना काळामध्ये केलेले त्यांचे कार्य प्रेरणादायी असून करंजे भालेवाडी भूषण पुरस्काराने यांचा सन्मान निश्चित कौतुकास्पद असुन त्यांच्या सत्कार्याची ही खरी पावती आहे असे मत ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार बाबुराव हिरडे यांनी व्यक्त केले. करमाळा तालुक्यातील कंरजे भालेवाडी येथील राजकुमार पवार त्यांच्या सहकार्यांच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की एका मध्यमवर्गिय कुटुंबात जन्म घेऊन प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन स्वकर्तुत्वाने शून्यातून विश्व निर्माण करुन रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून डॉक्टर रविकिरण पवार यांच्या पत्नी योगिता यांनी काम केले आहे त्यांचा चिरंजीव अजिंक्य हा ही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून डॉक्टर झाला असून आपल्या वडिलांच्या रुग्णसेवेचा वारसा पुढे चालवणार आहे. डॉक्टर रवीकिरण पवार यांच्या धर्म पत्नी योगिता रविकरण पवार चिरंजीव डॉक्टर अजिंक्य पवार यांचा करंजे भालेवाडी या ग्रामस्थांच्या उपस्थितीत करंजे भालेवाडी भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करमाळा डॉक्टर असोसिएशन कुणबी मराठा सेवा संघ मराठा सेवा संघ सकल मराठा समाज मी क्षेत्रातील मान्यवर विविध समाजाच्यावतीने राजकीय नेते मंडळी यांनी त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.